शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्थानिक करआकारणीतून महावितरणला सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

बारामती : स्थानिक पातळीवर करआकारणी केल्यास त्याचा फटका सरतेशेवटी वीज ग्राहकांनाच दरवाढीच्या रूपाने बसत असल्याने शासनाने महावितरणसह विजेची ...

बारामती : स्थानिक पातळीवर करआकारणी केल्यास त्याचा फटका सरतेशेवटी वीज ग्राहकांनाच दरवाढीच्या रूपाने बसत असल्याने शासनाने महावितरणसह विजेची निर्मिती, पारेषण करणाऱ्या शासकीय कंपन्यांना करआकारणीतून वगळलेले आहे. ही वस्तुस्थिती असताना काही ग्रामपंचायती त्यांचा पाणीपुरवठा व दिवाबत्तीचा वीजपुरवठा खंडित केल्यास महावितरणला करआकारणी करून महावितरणच ग्रामपंचायतीचे देणे लागत असल्याचा बनाव करून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत, असा दावा महाविरणने केला आहे.

दीड वर्षापासून कोरोना महामारीने जग ठप्प आहे. मात्र, महावितरण व त्यांचे वीज कर्मचारी ग्राहकांना कठीण परिस्थितीवर मात करून अखंड वीजपुरवठा करीत आहेत. एकीकडे विजेचा अखंड वापर सुरू आहे, तर दुसरीकडे वीज बिल भरण्याकडे ऐनकेन कारणामुळे दुर्लक्ष होत आहे. परिणामी बारामती परिमंडलात थकबाकीचा डोंगर १ हजार ४०० कोटींच्या घरात गेला आहे. शेती वगळून १० लाख २७ हजार ग्राहक थकबाकीदार आहेत. यामध्ये दिवाबत्तीचे ९१० कोटी तर, पाणीपुरवठा योजनांचे १४७ कोटी रकमेचा समावेश आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासारख्या सधन भागात ५० टक्के ग्राहक थकबाकीदार आहेत. वाढलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने राज्य पातळीवर मोहीम हाती घेतली असून, बारामती परिमंडलात सोलापूर, सातारा व बारामती मंडलांतर्गत वीज बिल वसुलीची मोहीम सुरू आहे.

राज्य शासनाने २०१८ मध्येच काढला अध्यादेश...

ग्रामपंचायतींना दिवाबत्तीच्या व पाणीपुरवठा योजनांची वीज बिले भागविण्यासाठी शासनाने १५ व्या वित्त आयोगातील रकमेची तरतूदसुद्धा केली आहे. अनेक ग्रामपंचायती या तरतुदीतून आपले वीज बिल भरून सहकार्य करीत आहेत. तर काहींनी महावितरणलाच थकबाकीदार दाखवत आहेत. दरवेळी उभा राहणारा हा पेच सोडविण्यासाठी राज्य शासनाने सविस्तर आदेश काढून संबंधित विभागांना सूचित केले होते. या आदेशात, ‘महावितरण या शासकीय वीज कंपनीकडून राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत वीज पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. त्यासाठी कंपनीकडून ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या हद्दीत उपरी वाहिन्या, भूमिगत वाहिन्या, वितरण रोहित्रे, विजेचे खांब व पारेषणचे मनोरे उभारले जातात. या सर्वांवर जर स्थानिक पातळीवर करआकारणी झाल्यास त्या करांचा बोजा कंपनीच्या वार्षिक महसुलात समाविष्ट होऊन त्याचा समावेश वीजदरात होऊन वीज दरवाढ होते. त्यामुळे अशी कोणतीही करआकारणी करण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. २० डिसेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार संबंधित विभागांना अधिनियम बनविण्याचे तर, ग्रामविकास व नगरविकास विभागालाही सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देशित केलेले आहे.