शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: भाजपा-शिवसेना यांच्यात पुल बांधणार का?, गडकरींनी नेमकं उत्तर दिलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 23:29 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यात 'लोकमत' आयोजित 'पत्रकार पुरस्कार २०२२' कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

पुणे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यात 'लोकमत' आयोजित 'पत्रकार पुरस्कार २०२२' कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नितीन गडकरींनी मुलाखतीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर महत्वाचं विधान केलं आहे. राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यातील राजकीय द्वंद्व संपुष्टात येऊन भविष्यात पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये पुल बांधण्याचं काम नितीन गडकरीच करू शकतात असं विचारलं असता नितीन गडकरी यांनी स्पष्ट उत्तर दिलं. "जे पुल बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे तेच पुल मी बांधतो. सध्या मी नॅशनल हायवे बांधत आहे", असं उत्तर देत आपलं सध्या राष्ट्रीय राजकारणाकडेच लक्ष असल्याचं सूचित केलं.  

राजकारणातील सध्याच्या आक्रस्ताळेपणाबद्दल विचारलं असता गडकरींनी आपण एकमेकांच्या विचारांचे विरोधक होऊ शकतो पण शत्रू होऊ शकत नाही. विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता जास्त धोकादायक आहे, असं महत्वाचं विधान केलं. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी गडकरींनी विविध प्रश्नांवर भाष्य केलं. यात पहिल्याच प्रश्नात गडकरींनी राज्यातील राजकारणावर भाष्य केलं. भाजपा आणि शिवसेना यांच्यात सध्या जो वितुष्ट निर्माण झाला आहे तो दूर करण्याचं काम फक्त नितीन गडकरीच करू शकतात असा विश्वास अनेकांना वाटतो. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील पुल गडकरी बांधणार का?, असं गडकरींना विचारण्यात आलं. त्यावर गडकरींनी एका क्षणात उत्तर दिलं. "जे पुल बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे तेच पुल मी बांधतो. माझ्याकडे सध्या राज्यातले आणि जिल्ह्यातले रस्ते बांधण्याचं काम नाही. मी नॅशनल हायवे बांधतो. मी बाकीच्या गोष्टींबद्दल फार विचार करत नाही. प्रत्येकजण त्या त्या गोष्टीसाठी सक्षम असतो", असं गडकरी म्हणाले. 

काँग्रेस पक्ष मजबूत व्हायला हवा"लोकशाही दोन चाकांवर चालते. एक सत्ताधारी आणि दुसरा विरोधी पक्ष. त्यामुळे माझी मनापासून इच्छा आहे की काँग्रेस पत्र मजबूत व्हायला हवा. पण सध्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेस पक्षाची जागा एक स्थानिक पक्ष घेत आहे हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षानं मजबूत असणं खूप गरजेचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरु एक उत्तम उदाहरण आहेत. अटलबिहारी वाजपेयी निवडणूकीत पराभूत झाल्यानंतरही पंडितजींनी त्यांचा सन्मान केला होता. त्यामुळे लोकशाहीत विरोधी पक्षाचं स्थान खूप महत्वाचं आहे आणि काँग्रेस पक्षानं मजबूत व्हायला हवं", असं नितीन गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना