शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार; हडपसरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 17:57 IST

संबंधित मुलीचे तिच्या पालकांबरोबर वाद झाले होते. यामुळे ती घरातून रुसून बाहेर पडली आणि तिच्या मित्राला भेटायला निघाली होती.

पुणे : पालकांशी वाद झाल्याने घर सोडून मित्राला भेटायला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसरपोलिस ठाण्यामध्ये चार जणांविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील दोघा आरोपींना गुरूवारी रात्री पकडण्यात आले आहे. मात्र त्याचे दोन मित्र फरार आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी मंगळवारी (२७ ऑक्टोबर) हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. तिला कोणीतरी फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरू होता. दरम्यान, पोलिसांना ती गुरुवारी दुपारी सासवड येथे सापडली. तेव्हा तिने चार मित्रांनी माझ्यावर बलात्कार केला असल्याचे सांगितले. तातडीने मुलीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हडपसर पोलिस ठाण्याच्या तपास पथकांनी आरोपींचा शोध सुरु केला. गुरुवारी रात्री उशिरा दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले.

संबंधित मुलीचे तिच्या पालकांबरोबर वाद झाले होते. यामुळे ती घरातून रुसून बाहेर पडली आणि तिच्या मित्राला भेटायला निघाली होती. रस्त्यात यातील एक आरोपी तिला भेटला. त्याने मी तुझ्या नातेवाईकांना ओळखत असून मी तुला मित्राकडे सोडतो असे सांगितले. यानंतर तिला एके ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर संबंधित तरुणाने त्याच्या दुस-या एका मित्राला बोलावून घेतले. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. याप्रकारे इतर आणखी दोघा मित्रांनी येऊन तिच्यावर बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ..... 

टॅग्स :HadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीGang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसArrestअटक