शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात याेग दिनाचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 14:34 IST

पुणे शहरात याेग दिन उत्साहात साजरा करण्यात आला

पुणे : जागतिक याेग दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. शहरातील सर्वच शाळांमध्ये याेगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलच्या 4 हजार 200 विद्यार्थ्यांनी याेगा केला. तसेच पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा याेगा केला. 

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे दोन हजारहून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनीनी  फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे योग प्रात्यक्षिके सादर केली . एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार , 'आझम स्पोर्ट्स अकादमी'चे संचालक गुलझार शेख  ,प्राध्यापक ,शिक्षक वर्ग इत्यादी उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त शि. प्र. मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनचे (विकासा) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमात जवळपास ३००० विद्यार्थी, शिक्षक व सीए इन्स्टिट्यूट सहभागी झाले होते. यावेळी शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षा ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

भावे हायस्कूल मध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी दरवर्षी भावे हायस्कूल मध्ये हा दिवस साजरा करण्यात येतो. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ यांनी २१ जून लाच योग का करतात याची वैज्ञानिक आणि पारंपरिक माहिती सांगितली. यामध्ये शाळेच्या ३०० विद्यार्थी व शिक्षकांनी भाग घेतला. पतंजली योगपीठाचे श्री भडाळे, शशी भाटे यांनी यागाचे विविध प्रकार, प्राणायाम याची प्रात्याक्षिके विद्यार्थ्यांकडून करवून घेतली व त्याची शास्त्रोक्त माहिती सांगितली. 

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सर्वप्रथम 2015 साली राजपथावर 21 जून राेजी याेगदिन साजरा केला. भारत सरकारच्या प्रयत्नामुळे 21 जून हा जागतिक याेगदिन म्हणून साजरा केला जाताे. भारताबराेबरच जगभरात हा दिवस उत्साहात साजरा केला जाताे. 

टॅग्स :YogaयोगPuneपुणेHealthआरोग्यInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन