सोमेश्वर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार
By Admin | Updated: March 29, 2017 00:05 IST2017-03-29T00:05:01+5:302017-03-29T00:05:01+5:30
येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचा मध्य विभागातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम

सोमेश्वर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार
सोमेश्वरनगर : येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचा मध्य विभागातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच मांजरी या ठिकाणी प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम आदींच्या हस्ते हा पुरस्कार सोमेश्वर कारखान्याला प्रदान करण्यात आला.
साखर उतारा, टनाला वाढलेले उत्पादन, साखर उत्पादन खर्च, नेटवर्थ या सर्वच निकषामध्ये सोमेश्वर कारखाना पात्र ठरल्याने कारखान्यास उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्ष सिद्धार्थ गिते, कार्यकारी संचालक सुरेश तावरे, फायनान्स मॅनेजर बाळासाहेब कदम, संचालक सुनिल भगत, नामदेवराव शिंगटे, विशाल गायकवाड, लालासाहेब माळशिकारे, किशोर भोसले, दिलीप थोपटे, ऋतुजा धुमाळ, शैलेश रासकर, महेश राणे, दिलीप थोपटे कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व अधिकारी वर्गाने पुरस्कार स्वीकारला.
कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप म्हणाले, सर्व सभासदांच्या सहकार्यामुळे तसेच कारखान्याचे अधिकारी, कामगार, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार यांच्या प्रामाणिक कामातून कारखान्यास उत्कृष्ट अर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार मिळाला आहे. (वार्ताहर)
नवले उत्कृष्ट कार्यकारी संचालक
बावडा : इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.बी. नवले यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट कार्यकारी संचालक’ हा पुरस्कार सोमवारी मांजरी बु. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे हस्ते सपत्निक स्वीकारला. नवले हे सहकारी साखर कारखानदारीमध्ये सुमारे ३९ वर्षांपासून काम करीत आहेत. नीरा भीमा साखर कारखान्यास केंद्र व राज्य पातळीवरील उत्कृष्ट कामगिरीची एकूण १० विविध पारितोषिकेही नवले हे कार्यकारी संचालक असताना प्राप्त झालेली आहेत.