थर्मलगन , ऑक्सिमीटरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST2020-12-06T04:10:33+5:302020-12-06T04:10:33+5:30
मेखळी: कोरोना विषाणूशी मानवाची झुंज सुरू असताना राज्य सरकारने शाळा उघडण्याची परवानगी दिली. त्यानुसार मंगळवार (दि.१ डिसें) रोजी ...

थर्मलगन , ऑक्सिमीटरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांची तपासणी
मेखळी: कोरोना विषाणूशी मानवाची झुंज सुरू असताना राज्य सरकारने शाळा उघडण्याची परवानगी दिली. त्यानुसार मंगळवार (दि.१ डिसें) रोजी मेखळी येथील न्यू इंग्लिश स्कूलची घंटा वाजली. कोरोनापासून विद्यार्थी सुरक्षित राहण्यासाठी शिक्षकांनी प्रभावीपणे नियोजन करीत दक्षता घेतली. थर्मलगन व पल्स आॅक्सिमीटरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.त्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.
यंदा मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू झाला. तेव्हापासूनच शाळा, महाविद्यालये बंद होती. अखेर तब्बल चार महिने लांबलेले हे शालेय सत्र अखेर सोमवारी प्रारंभ करण्यात आले. पण, न्यू इंग्लिश स्कूल मधील शिक्षकांचे कोरोनाचे रिपोर्ट उशिरा आल्यामुळे विद्यालय उशीरा सुरु केल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र धायगुडे यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी इयत्ता दहावीचे ७३ पैकी ३६ तर नववीचे ७५ पैकी २३ विद्यार्थी हजर होते.दररोज केवळ चार तासिका होणार असून या शाळा दोन तास चालणार आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय फक्त शाळेत शिकवण्यात येतील. इतर विषय व उर्वरित अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करायचा आहे.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बाक ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थी येताच त्यांचे स्वागत हॅण्ड सॅनिटायझर व साबणाने झाले.यावेळी माजी सरपंच हनुमंत देवकाते उपस्थित होते.विद्यार्थ्यांना निजंर्तुक करून त्यांनी मास्क लावला की, नाही याची पाहणी करून वर्गात सोडण्यात आले. थर्मलगन व पल्स ऑक्सिमीटरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.विद्यार्थ्यांनी देखील सॅनिटायझर सोबत आणले होते.सर्व काळजी घेऊन शाळा व पालकांचे प्रबोधन करून शाळा सुरू झाल्या आहेत.
————————————————
बऱ्याच दिवसांनी शाळेत आल्यामुळे खूप बरं वाटलं.कारण घरी नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन अभ्यासात बरेच व्यत्यय येत होते.मात्र शाळा सुरु झाल्यामुळे सर्व शंकांचे निरसन होत आहे.
वैष्णवी गौंड, विद्यर्थीनी, इयत्ता दहावी
———————————————
फोटो
मेखळी येथील न्यू इंग्लीश स्कूलमध्ये थर्मलगन , ऑक्सिमीटरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर वर्गात सोडण्यात येते.
०५१२२०२०बारामती— २२