वडगाव काशिंबेगमध्ये १३० रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:06 IST2021-02-19T04:06:54+5:302021-02-19T04:06:54+5:30
यातील ३५ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अटलबिहारी वाजपेयी विचार मंचाच्या माध्यमातून संस्थापक संदीपभाऊ बाणखेले, भाजप तालुकाध्यक्ष ...

वडगाव काशिंबेगमध्ये १३० रुग्णांची तपासणी
यातील ३५ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अटलबिहारी वाजपेयी विचार मंचाच्या माध्यमातून संस्थापक संदीपभाऊ बाणखेले, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे व जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष संजयशेठ थोरात यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी शिबिर भरवण्यात येणार असे आरोग्यदूत सुशांत थोरात यांनी सांगितले.
या वेळी बाळासाहेब पिंगळे, जयवंत शिंदे, सचिन नवले, बंटी क्षीरसागर, रामदास शिंदे, पप्प डोके, प्रथमेश तारू, सौरभ टेके, रोहित डोके, संदीप दैने आदी उपस्थित होते. शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरास वडगाव ग्रामस्थ, बजरंग दलाचे संघटक दिनेश मोरे, अनिल मानकर, महेश डोके, संतोष कडूसकर, बंटी क्षीरसागर यांनी मोलाची मदत केली. या कार्यक्रमास भाजप तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र कानडे यांनी केले. आभार आरोग्यदूत सुशांत थोरात यांनी मानले.