शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:46 IST

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या तीन माजी विद्यार्थ्यांनी ६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे.

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या तीन माजी विद्यार्थ्यांनी ६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या डिप्लोमा फिल्म्सची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने एफटीआयआयच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये एफटीआयच्या तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. अरुण कृपास्वामी या दिग्दर्शन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने दिग्दर्शित केलेल्या ‘मंडे’ या डिप्लोमा फिल्मला रजत कमळ आणि ५० हजार रुपयांचे स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड, तसेच टीव्ही विभागाच्या मेधप्रणव पोवार याने केलेल्या ‘हॅपी बर्थ डे’ला ‘बेस्ट फिल्म आॅन फॅमिली व्हॅल्यूज अ‍ॅवॉर्ड’ तर स्वप्निल कापुरे याच्या ‘भरदुपारी’ला ‘स्पेशल मेन्शन अ‍ॅवॉर्ड’ जाहीर झाले आहे. आपल्या कामाला राट्रीय पुरस्कार मिळणे हा सर्वोच्च सन्मान असल्यासारखे आहे. यामुळे आत्मविश्वास दुणावला असून, जबाबदारीही वाढली असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.>एफटीआयआयकडून शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या डिप्लोमा फिल्म्सची निवड करून विविध महोत्सव आणि पुरस्कारांसाठी त्या फिल्म पाठविल्या जातात. माझ्या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, याच्याच ‘शॉक’मध्ये मी अजून आहे. तंत्रज्ञान कंपन्या आपला कशा पद्धतीने वापर करत आहेत, यावर फिल्ममध्ये भाष्य करण्यात आले आहे.- अरुण कृपास्वामी, माजी विद्यार्थी>मी मूळचा जळगावचा. शिवणकाम हा कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय. थिएटरची आवड असल्याने पुण्यात आलो. डिप्लोमा इन कम्युनिकेशन स्टडीजची पदवी मिळविली. गाभ्रीचा पाऊस, लूज कंट्रोल अशा चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शन केले. पण कलेच्या शिक्षणासाठी एफटीआयआयला प्रवेश घ्यावा, असे वाटले. पण दोनदा संधी हुकली. नंतर प्रवेश मिळाला. शेवटच्या वर्षात केलेल्या ’भरदुपारी’ या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद आहे. या फिल्ममध्ये ज्या घटनेशी आपला संबंध नसतो त्या घटनेमध्ये कसे गुरफटत जातो, असे कथानक मांडण्यात आले आहे.- स्वप्निल कापुरे, माजी विद्यार्थी>पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद आहे. एका सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधणारी माझी फिल्म आहे. समाज एका विशिष्ट कामाला कोणत्या नजरेतून पाहतो यावर ‘हॅपी बर्थडे’ची निर्मिती करण्यात आली आहे. व्यावसायिक चित्रपट बनवा पण सामाजिक प्रबोधनपर चित्रपटही तयार करा, अशा स्वरूपाचे स्वातंत्र्यही आम्हाला एफटीआयआयकडून मिळाले आहे.- मेधप्रणव पोवार, माजी विद्यार्थी