ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांचे प्रात्यक्षिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 01:28 PM2023-10-21T13:28:25+5:302023-10-21T13:29:01+5:30

नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशिनचे ऑडिट करायला लावणे आवश्यक आहे....

EVM machines can be tampered with; Demonstration by IT expert Madhav Deshpande | ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांचे प्रात्यक्षिक

ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांचे प्रात्यक्षिक

पुणे : ईव्हीएम मशिन हे माणसाने तयार केले आहे. त्यामुळे त्यामध्ये काहीही सेटिंग करता येते. एक बटनाऐवजी दोन बटन दाबले तर विशिष्ट व्यक्तीला मत जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशिनचे ऑडिट करायला लावणे आवश्यक आहे, अशी माहिती आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांनी दिली.

मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने शुक्रवारी एस.एम.जोशी सभागृहात ‘ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ होऊ शकतो का?’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी त्यांनी ईव्हीएम मशिनचे प्रात्यक्षिक दाखविले. कशाप्रकारे मशिनमध्ये चुकीचे सेटिंग करता येऊ शकते, ते दाखवून दिले. मशिन ही शेवटी माणसाने बनवली असल्याने त्यात गोंधळ करता येतो; पण तसा गोंधळ होऊ नये म्हणून मशिन अत्याधुनिक असायला हव्यात. त्यात मशिन सुरू कधी झाली, त्याची नोंद यायला हवी. ते ऑनलाइन सर्व्हरवर दिसायला हवे. मशिनमध्ये पहिले मतदान कधी झाले, कोणी केले, त्याची वेळ हे देखील नमूद व्हायला हवे. एखादा मतदार म्हणाला की, मी दिलेले मतदान ज्याला दिले त्यालाच मिळाले का? हे तपासायचे आहे. तर ते मशिनमध्ये दिसायला हवे. तरच पारदर्शक निवडणूक झाली, असे म्हणता येऊ शकेल. दहा मशिनपैकी एका मशिनमध्ये चुकीचे सेटिंग करता येते. सर्वच मशिनमध्ये करायला हवे असे नाही. त्यामुळे नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे याविषयी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे.

Web Title: EVM machines can be tampered with; Demonstration by IT expert Madhav Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.