घोटावडे फाट्यावर दररोज चक्काजाम

By Admin | Updated: April 29, 2017 03:50 IST2017-04-29T03:50:42+5:302017-04-29T03:50:42+5:30

पुणे-कोलाड मार्गावरील मुळशी तालुक्यातील सर्वांत मोठा व महत्वाचा असणाऱ्या घोटावडे फाटा चौकामध्ये नेहमीच वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.

Everyday light on the ghatavade ghat | घोटावडे फाट्यावर दररोज चक्काजाम

घोटावडे फाट्यावर दररोज चक्काजाम

पिरंगुट : पुणे-कोलाड मार्गावरील मुळशी तालुक्यातील सर्वांत मोठा व महत्वाचा असणाऱ्या घोटावडे फाटा चौकामध्ये नेहमीच वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना व ग्रामस्थांना करावा लागत आहे.
मुळशी तालुक्याला लाभलेली मोठी औद्योगिक वसाहत व आयटी पार्कमुळे तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे नोकरीसाठी व उद्योगधंद्यासाठी ये-जा करण्यांचे प्रमाण वाढले आहे. पुणे, पिपरी-चिंचवड किंवा उपनगरांमधून दररोज ये-जा करीत असतात. त्यामुळे बस, कार, दुचाकी व मालवाहतूक गाड्या आणि कंटेनर या वाहनांचे प्रमाण वाढले आहे.
त्यातच मुळशी तालुक्यातील पिरंगुट, उरावडे, पौड, घोटावडे, हिंजवडी, माण, घोटावडे फाटा चौकाच्या चारही बाजूला असलेल्या गावांमध्ये लहान-मोठे उद्योगधंदे व औद्योगिककरण आहे. त्यामुळे चारही बाजूने ये-जा करणारी वाहने या चौकात एकत्रित येतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते.
तसेच घोटावडे फाटा चौक हा मुळशी तालुक्यातील सर्वांत महत्वाचा व मोठा चौक आहे. चौकाच्या पूर्वेला पुणे, पश्चिमेला कोकण, दक्षिणेला लवासा व उत्तरेला हिंजवडी आयटी पार्क अशी महत्वाची ठिकाणे आहेत. चारही दिशेचे रस्ते चौकामध्ये जोडलेले आहेत.
संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान बहुतांशी कंपन्या, शाळा व सरकारी आॅफिसेस सुटतात. त्यावेळी वाहतुकीची खूपच मोठी कोंडी होते.
काही दिवसांपूर्वी या चौकामध्ये सिग्नल बसविण्यात आला. परंतु तो सिग्नल केवळ शोभेची वस्तू बनून राहिलेला आहे. कारण, या सिग्नलमुळे कोंडी सुरळीत करता येत नसल्याने वाहतूक पोलिसांकडून तो बंद ठेवण्यात येतो.
महत्वाचे म्हणजे वाहतूकही विस्कळीत असते. त्यात रस्ता अरुंद पडतो. चौकामध्ये पोलिसांनी वाहनचालकांना थांबण्याचा इशारा केल्यानंतर नेमके थांबायचे कुठे, हाच मोठा प्रश्न वाहनचालकांना पडतो. कारण या ठिकाणी चौकामधील रस्त्यावर रोड लाईन नाही. सिग्नलला वाहने उभी राहिल्यानंतर पादचाऱ्यांनी रस्ता कोठून व कसा ओलांडायचा हा मोठा प्रश्न त्यांना पडतो. कारण, या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग नाही. रस्ता विभाजन, रोड कटिंग लाईन नसल्याने रोडच्या एकाच बाजूला सरळ लाइनमध्ये वाहनचालक काळजीपूर्वक वाहन घेत नाही.
(वार्ताहर)

Web Title: Everyday light on the ghatavade ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.