शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आरटीओतील प्रत्येक काम आता ‘अपॉईंटमेंट’ वर; शुक्रवारपासून कामकाज पूर्ववत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 20:06 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद होते.

ठळक मुद्दे पक्का व शिकाऊ परवान्याप्रमाणे आता कार्यालयामध्ये प्रत्येक कामासाठी आगाऊ वेळ

पुणे : लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज शुक्रवार (दि. १९)पासून सुरू होत आहे. मात्र, पक्का व शिकाऊ परवान्याप्रमाणे आता कार्यालयामध्ये प्रत्येक कामासाठी आगाऊ वेळ (अपॉईंटमेंट) घ्यावी लागणार आहे. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परवाना कोटाही जवळपास ८० ते ८५ टक्क्याने कमी करण्यात आलेला आहे.परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील परवाना, योग्यता प्रमाणपत्र, हस्तांतरण यांसह विविध नियमित कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी पुणे कार्यालयाने सर्वच कामांसाठी आगाऊ वेळ घेणे बंधनकारक केले आहे. वेळ घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही. त्यानुसार आयडीटीआर, भोसरी, आळंदी रस्ता, दिवे व मुख्य कार्यालयांसाठी स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात आला आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीचे कामे प्राधान्याने करण्यात येणार आहे. गरज भासल्यास व्हीआयपी कोट्याचा सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध असेल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. शिबीर कार्यालयामध्ये मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत. गुरूवार (दि. १८) पासून आॅनलाईन पध्दतीने आगाऊ वेळ घेता येईल. तर शुक्रवारपासून प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. पुर्वी केवळ परवाना व योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण या सेवांसाठीच आॅनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागत होती.----------------आरटीओकडून दक्षता- दोन अर्जदारांध्ये किमान ६ फुटांचे अंतर- चाचणी झाल्यानंतर संगणक, की बोर्ड सॅनिटाईज करणार- मास्क व हँडग्लोज बंधनकारक- पक्क्या परवान्यासाठी वाहन सॅनिटाईज केलेले असावे- ड्रायव्हिंग स्कुलचे वाहन प्रत्येक चाचणीवेळी सॅनिटाईज करणार- योग्यता प्रमाणपत्रासाटी आलेले वाहनही सॅनिटाईज करणार------------------ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी संकेतस्थळwww.rto.org.in/pune--------------वाहनविषयक कामांसाठी दैनंदिन अपॉईंटमेंट कोटाठिकाण कामाचे स्वरूप दैनंदिन कोटाआयडीटीआर पक्का परवाना चाचणी ७५(दुचाकी व चारचाकी एकत्र)आळंदी रस्ता पक्का परवाना चाचणीदुचाकी ७५ऑटोरिक्षा २५बॅज १०

दिवे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणऑटोरिक्षा २५टुरिस्ट टॅक्सी २५मालवाहू वाहने ४०प्रवासी बस २०मुख्यालय नवीन शिकाऊ परवाना ५०चाचणीतून सुट असलेला परवाना ५०परवानाविषयक नुतणीकरण ३०दुय्यम प्रत ३०नाव, पत्ता बदलणे १५आयडीपी ०५वाहनविषयक हस्तांतरण ३०कर्जबोजा नोंद करणे २०कर्जबोजा उतरविणे ३०दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र २०बीटी, फेरफार, आरएमए १०नोंदणी नुतनीकरण ०५नोंदणी रद्द करणे ५ना हरकत प्रमाणपत्र ३०पत्ता बदलणे १०

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर