बारामतीत प्रत्येक महिन्याच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:11 IST2021-01-25T04:11:50+5:302021-01-25T04:11:50+5:30
बारामती : बारामती तालुक्यातील सर्व आठ मंडल कार्यालयांत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत भरणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ...

बारामतीत प्रत्येक महिन्याच्या
बारामती : बारामती तालुक्यातील सर्व आठ मंडल कार्यालयांत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत भरणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. यामध्ये प्रलंबित नोंदी घेण्यासाठी नोंदी करणे गरजेचे असल्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले.
तालुक्यात असणाऱ्या सर्व ८ मंडल कार्यालयांत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यामध्ये फेरफार अदालत घेण्यात आली. या फेरफार अदालतीमध्ये प्रलंबित असणारे फेरफार निर्गत करणेचे कामकाज करण्यात आले. यामध्ये बारामती मंडलामध्ये १५२, उंडवडी कप मंडलामध्ये १४७, सुपा मंडलामध्ये ५५, मोरगाव मंडलामध्ये ९२, लोणी भापकर मंडलामधील ३२, वडगाव निंबाळकर मंडलातील १२९, माळेगाव मंडलामधील ४९, पणदरे मंडलामधील ७२, अशा एकूण ७२८ नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत. तसेच नव्याने १६४ नोंदी धरण्यात आल्या आहेत. या वेळी सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांनी मंडल मुख्यालयात उपस्थित राहून फेरफार अदालतीचे कामकाज पार पाडले. यापुढेही फेरफार अदालत सर्व मंडल मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत.
कोरोना व निवडणुकीच्या काळात कामे थांबली होती. त्यांच्या फेरफार नोंदी निर्गत करुन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी ज्यांच्या नोंदी प्रलंबित असतील तर तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात अर्ज करावा. त्यांची नोंद बुधवारी होणाऱ्या मंडल अदालतीमध्ये होणार आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.