शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

झोपडपट्टीत व गर्दीच्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकाची तपासणी करणार : डॉ. दीपक म्हैसेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 15:03 IST

गेल्या पाच-सहा दिवसांत पुणे शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिक व अन्य आजार असणाऱ्यांवर अधिक लक्ष  तपासणीसाठी 350 स्वतंत्र पथके तयार 

पुणे : पुण्यात प्रामुख्याने झोपडपट्टी व गर्दी, दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने स्वतंत्र 350 पथके तयार केली आहेत. या पथकांच्या मार्फत कोरोना प्रभावित क्षेत्रात घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य आजार असणाऱ्यांवर अधिक लक्ष वर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. 

गेल्या पाच-सहा दिवसांत पुणे शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामध्ये देखील मध्यवस्तीत, झोपडपट्टीत आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये ही संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना करून देखील रूग्णांची संख्या अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाही. यामुळेच महापालिका प्रशासनाने या भागावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील प्रत्येक घरा-घरांमध्ये जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. या भागात ज्येष्ठ नागरिक व ज्यांना इतर विकार आहेत जसे की, डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा अश्या वेगवेगळ्या विकारांमुळे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि असे विकार असणाऱ्या व्यक्ती कोरोनाबाधित होवून तो रोग त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुढाकारातून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्या आहेत,त्या भागात 350 पथके पाठविण्यात येत आहे. या पथकाकडे पल्स ऑक्सिमीटर, थर्मोस्कॅनर देण्यात आले आहेत. या माध्यमातून विविध विकार असलेल्या रुग्णांचा तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची ऑक्सिजन सर्क्युलेशन लेव्हल, त्यांचे विकार नियंत्रणात आहेत की नाही, आणि त्यांना संभाव्य कोविड रोग होत असेल तर त्यांना वेगळे करुन त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याबाबतची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे.     पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेअंतर्गत आपल्या घरातील ज्येष्ठ तसेच इतर काही विकार असणाऱ्या व्यक्तीला तपासून वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या घरात वेगळ्या रुममध्ये ठेवणे किंवा मनपाने सोय केलेल्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. कोरोना या रोगावर मात करण्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. 60 ते 70 टक्के लोकांना हा रोग जीवघेणा ठरत नाही, मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत या मोहिमेअंतर्गत त्यांची तपासणी करुन घ्यावी , असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdiabetesमधुमेहHeart DiseaseहृदयरोगHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल