शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अखेर पोलीस यंत्रणेनेच टोचले पालिकेचे कान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 8:38 PM

पोलीस बंदोबस्त देतो पण पार्किंगमधील अतिक्रमणे हटवा

पुणे : बाणेर रस्त्यावरील नो पार्किंगच्या कारवाईमुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या पोलीस यंत्रणेने अखेर पुणे महापालिकेचे कान टोचले आहेत़. पोलीस बंदोबस्त देतो पण शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतींमधील पार्किंगच्या जागेतील व्यवसायांवर तत्काळ कारवाई करावी, असे पोलीस आयुक्त कार्यालयाने पालिका प्रशासनाला कळविले आहे़. पोलीस आयुक्तालयाकडून आलेल्या या सूचनेमुळे, बांधकाम विभाग, पथ विभाग, आकाशचिन्ह विभाग यांनी याबाबत काय कारवाई केली. याचा अहवाल व सद्यस्थितीची माहिती, येत्या २० नोव्हेंबरपूर्वी कळवावी अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त कार्यालयाने संबंधित खात्याला दिल्या आहेत़. शहरातील मुख्य रस्त्याच्यांवरील पार्किंगचा विषय सध्या मोठा गंभीर बनला आहे़. त्यातच बाणेर रस्त्यावर येऊ घातलेल्या मेट्रोच्या कामांमुळे वाहतुक पोलीसांनी दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन केला़. परिणामी या नो पािर्कंगच्या कारवाईचे खापर हे वाहतुक पोलीसांवरच फोडले गेले़ परंतू या रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने ही रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिक इमारतींमध्ये येणाºया ग्राहकांचीच असल्याने, या इमारतींमध्ये पार्किंग जागा असताना पालिका येथील अतिक्रमण व बांधकामाकडे दुर्लक्ष करीत आली आहे़. याकडे लक्ष वेधत पोलीसांनी पालिका प्रशासन या पार्किंगच्या जागेतील व्यवसायावर व बांधकामांवर कारवाई का करीत नाही, असा प्रश्न ११ नाव्हेंबरला झालेल्या बैठकीत पालिका प्रशासनाला विचारला होता़. यामुळे आज महापालिका आयुक्त कार्यालयाने संबंधित खात्याला शहरातील व्यावसायिक इमारतींमधील जागेतील व्यवसाय, अतिक्रमणे व बांधकामे याचा अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत़. या बैठकीत मनपा प्रशासनाच्यावतीने फुटपाथवरील अतिक्रमण व फ्रंट मार्जिनवर कारवाई करूनही, परत अतिक्रमण होत असल्याचे सांगितले़. यावर परत अतिक्रमणे झाल्यास वाहतुक शाखेस त्याची माहिती द्यावी. तसेच अतिक्रमण कारवाईत एक पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस कर्मचारी मिळतील असा पर्यायही पुढे आला आहे़. २० नोव्हेंबरला पुणे मनपा व पोलीस विभाग यांच्यात होणाऱ्या समन्वय बैठकीत राज्य विद्युत महामंडळासही आमंत्रित करण्यात आले असून, वाहतुकीला अडथळे ठरणारे विजेचे खांब व इतर रचना हटविण्याबाबतही चर्चा होणार आहे़.तसेच पालिकेला आवश्यक असलेल्या पोलीस परवानग्या २४ तासात देण्याबाबतही पोलीसयंत्रणेने सांगितले आहे़. दरम्यान या बैठकीत बंद पडलेले सिग्नल,अरूंद रस्ते, अनधिकृत बांधकाम कारवाईचे गुन्हे तात्काळ दाखल करून घेणे यावरही निर्णय होणार आहे़.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसEnchroachmentअतिक्रमण