Pune Corona News: शहरात शुक्रवारीही रुग्ण ५ हजारांच्या पुढे; तर २ हजार कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 20:29 IST2022-01-14T20:22:38+5:302022-01-14T20:29:20+5:30
आज शहरात २० हजार १४९ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी २७.१९ टक्के आहे

Pune Corona News: शहरात शुक्रवारीही रुग्ण ५ हजारांच्या पुढे; तर २ हजार कोरोनामुक्त
पुणे : शहरात आजही कोरोनाबाधितांची संख्या पाच हजाराच्या पुढेच असून, दिवसभरात ५ हजार ४८० जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. आज शहरात २० हजार १४९ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी २७.१९ टक्के आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्ण संख्या २८ हजार ५४२ इतकी झाली असून, एकूण कोरोना बाधितांपैकी केवळ ४.१५ टक्के रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. दिवसभरात २ हजार ६७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी दोन जण पुण्याबाहेरील आहे. आजपर्यंत शहरात ४० हजार ६८ हजार ३२१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ५ लाख ४८ हजार ४६९ जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ५ लाख १० हजार ७९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार १३४ जण दगावले आहेत.