शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जुलै अर्धा संपत आला तरी पावसाळीपूर्व कामे अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:01 IST

पुणे : महापालिकेकडून दरवर्षी पावसाळीपूर्व कामाअंतर्गत शहरातील नाले, ओढे, शहरातील गटारांची स्वच्छता केली जाते. पण यंदा मे महिन्यात मोठ्या ...

पुणे : महापालिकेकडून दरवर्षी पावसाळीपूर्व कामाअंतर्गत शहरातील नाले, ओढे, शहरातील गटारांची स्वच्छता केली जाते. पण यंदा मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पावसाळीपूर्व कामांचा खोळंबा झाला होता. त्यानंतर पावसाळीपूर्व कामे करण्यास सुरवात झाली. परंतु जुलै महिना अर्धा संपत आला तरीदेखील ही कामे अपूर्णच आहेत.महापालिका हद्दीतील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नालेसफाईसाठी २३ निविदा काढल्या असून, १४ कोटी खर्च करण्यात येत आहे. पावसाळी गटारे स्वच्छ करण्यासाठी १२ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळापूर्व नाल्यांमधील कचरा, वाढलेले गवत यांसह पाण्याच्या प्रवाहात येणारे अडथळे काढण्याची कामे याअंतर्गत करून ती पूर्ण होणे अपेक्षित होते. तसेच पावसाळी वाहिन्यांची साफसफाई करणे अपेक्षित होते. पण अद्यापही काही ठिकाणी ही कामे पूर्ण झालेली नाही. अनेक भागांतील नाल्याची साफसफाई अपूर्णच आहे.

शहरात पावसाचे पाणी साचणारी २२८ ठिकाणे आहेत. त्यापैकी १०० ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ५५ ठिकाणी तात्पुरती उपाय योजना केली आहे. शहरातील ३४ पाणी साचणारी ठिकाणी विद्युत पंप, कामगार लावून चारी तयार करून पाणी काढून द्यावे लागते. पाणी साचणारी दहा ठिकाणे पालिका हद्दीबाहेरची आहेत. उर्वरित २८ पाणी साचणाऱ्या ठिकाणी अद्यापही कामे सुरू आहेत.

समाविष्ट गावातील नालेसफाई अर्धवटचमे महिन्यात पाऊस झाल्यामुळे पावसाळापूर्व कामांमध्ये खोळंबा निर्माण झाला होता. त्यानंतरही समाविष्ट गावामधील नालेसफाईची धोकादायक ठिकाणीची कामे झाली आहेत. मात्र अन्य ठिकाणची नालेसफाईची कामे अधर्वटच आहेत. नाल्यामध्ये टाकला जातो मोठ्या प्रमाणात कचरा

पुणे महापालिका नाल्याची साफसफाई करते. मात्र या नाल्यामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे नालेसफाई करूनही कचरा टाकल्यामुळे ‘जैसे थे’ परिस्थिती होते.

शहरात पावसाचे पाणी साचणारी २२८ ठिकाणे आहेत. त्यापैकी १०० ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ५५ ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. उर्वरित २८ पाणी साचणाऱ्या ठिकाणी अद्यापही कामे सुरू आहेत. - संतोष तांदळे, अधिक्षक अभियंता, पुणे महापालिका 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड