शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"परवानगी नाही दिली तरी उपोषणाला बसणार"; मुंबईच्या आंदोलनावर जरांगे ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 15:06 IST

जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी सकाळी सांगवी फाटा येथे दाखल होणार आहे.

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील मोर्चाचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी अंतरावाली सराटीतून पुन्हा एकदा आरक्षणाच्या लढाईला सुरूवात केली असून अहमदनगरमार्गे ते मुंबईला जात आहेत. आज जरांगेंचा ताफा पुण्यात पोहोचला असून उद्या पिंपरी चिंचवडमध्ये मुक्कामी असणार आहे. तत्पूर्वी सरकारकडून विविध अधिकारी पाठवून त्यांची समजूत घातली जात आहे. 

जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी सकाळी सांगवी फाटा येथे दाखल होणार आहे. रक्षक चौक,जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिलमार्गे चापेकर चौक चिंचवडगाव असा मार्ग असणार आहे. पुढे चिंचवड स्टेशन- खंडोबा मंदिर, आकुर्डीमार्गे निगडी, भक्ती-शक्ती समूह शिल्पावरून तळेगावमार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहेत. तत्पूर्वी सरकारकडून त्यांची रॅली थांबवण्यासाठी समजतू घातली जात आहे. पुण्याजवळ आले असता सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना आपला निर्णय बदलण्याची विनंती केली. मात्र, आपण निर्णयावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा रांजणगावहून निघून नगररोडने कोरेगाव भिमामार्गे खराडीत मुक्काम केला. तेथून ही पदयात्रा खराडी बायपास- पुणे स्टेशन-  औंध गाव-  रक्षक सोसायटी - काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड स्टेशन - आकुर्डी - निगडी देहूरोड -(जुना एक्सप्रेस वे ने)- लोणावळा मुक्कामी जाणार आहे. जरांगेंच्या या रॅलीला मराठा समाजाचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या रॅलीतील सहभागी मराठ्यांच्या राहण्यासाठी, जेवणासाठी व इतर गोष्टींसाठी नियोजन केलं जात आहे. जरांगे पाटील आज पुण्यात आले असून उद्या पुण्यातून मुंबईकडे निघणार आहेत. तत्पूर्वी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आजच चर्चा करणार आहोत, त्यामुळे आपण आपल्या निर्णयावर विचार करावा, अशी विनंती संबंधित अधिकाऱ्यांकडून जरांगेंना करण्यात आली. मात्र, आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत. दोन दिवसांत मराठा आरक्षण न मिळाल्यास २६ जानेवारीपासून आपण आमरण उपोषणाला बसणार आहोत. सरकारने परवानगी दिली तरी, आणि नाही दिली तरी आपण उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे, जरांगे हे त्यांच्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे.  

पुण्यात वाहतून वळवली

पुणे शहर वाहतुक विभागाच्या वतीने दि. २३ रोजी दुपारी ३. ०० वा पासुन आवश्यकतेनुसार अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरातील मुंबई पुणे महामार्गावरील कोल्हापूर सातारा येथून येणारी अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडीमशीन चौक मंतरवाडी फाटा हडपसर मार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला नावे शिरूर मार्गे वळविण्यात आले आहे. त्यानंतर वाघोली लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा सोलापूर रोड येथून वाहतूक केडगाव चौफुला नावरा मार्गे ते शिरूर आशी वळवण्यात येणार आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण