शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

पुणे मॅरेथाॅनमध्ये यंदाही इथिओपियाच्या खेळाडूंचेच वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 12:03 IST

पुणे मॅरेथाॅनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही इथिओपियाच्या खेळाडूंनी बाजी मारल्याचे चित्र आहे.

पुणे : पुणेमॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे यंदाही इथिओपियाच्या खेळाडूंनी बाजी मारली. रविवारी पहाटे सिंहगड रोड परिसरात झालेल्या पुणे मॅरेथॉनच्या ३४व्या पर्वात महिला गटाच्या हाफ मॅरेथॉनमधील तिसरा क्रमांक सोडला तर पुरुष तसेच महिलांच्या फूल आणि हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजविले. मागील वर्षीही इथिओपियाच्याच खेळाडूंनी स्पर्धा गाजविली होती.

या वर्षी पुणे शहरात ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरु असल्याने वाहतुकीत अडसर नको म्हणून ही स्पर्धा सिंहगड रोडवर घेण्यात आली. पुरुष गटातील फुल मॅरेथॉन शर्यत सोलोमन टेका याने २ तास १७.६ मिनिटे वेळेत जिंकली. अब्दु केबेबे दुसरा आला. २ तास ४६.६ मिनिटे वेळ देणारी इगेझू बेलायनेश महिलांच्या फूल मॅरेथॉनमध्ये अव्वल ठरली. सिमन तिलाहून हिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हायलू इतिचा आणि गाशू सम्रावित यांनी अनुक्रमे पुरुष तसेच महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. इतिचा याने १ तास ६.३ मिनिटे तर, गाशू हिने १ तास १७.६ मिनिटे वेळ देत शर्यत जिंकली.

पुरुषांच्या फुल मॅरेथॉनचा विजेता सोलोमन टेका म्हणाला, आमच्या इथिओपियाचे खेळाडू पुणे मॅरेथॉनमध्ये कायम जिंकत असल्याने मीही या स्पर्धेत सहभागी होण्यास उत्सुक होतो. ही शर्यत जिंकायचीच या निर्धाराने ३ महिने सरावात स्वतःला झोकून दिले होते. शर्यतीच्या प्रारंभापासून केबेबेने आघाडी घेतलेली होती. शेवटच्या टप्प्यासाठी ऊर्जा वाचवून ठेवण्याला मी प्राधान्य दिले. अखेरचे तीन ते साडेतीन किलोमीटर अंतर शिल्लक असताना मी वेग वाढविला आणि स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरलो.

निकाल फुल मॅरेथॉन : पुरुष गट : सोलोमन टेका (इथिओपिया, २ तास १७.६ मिनिटे), अब्दू केबेबे (इथिओपिया, २.१९.३), देगेफा मेर्गा बेकेले (इथिओपिया, २.२०.४). महिला गट : यिगेझू बेलायनेश (इथिओपिया, २.४३.६), सिमन तिलाहून (इथिओपिया, २.५८.३), हेई मॅगेर्तू (इथिओपिया, २.४९.१). हाफ मॅरेथॉन : पुरुष गट : हायलू इतिचा (इथिओपिया, १.०६.३), उर्गे कुबा (इथिओपिया, १.०७.१), हाईल मेंगिस्तू (इथिओपिया, १.०७.२). महिला गट : गाशू सम्रावित (इथिओपिया, १.१७.६), तेफेरा कोलोन (इथिओपिया, १.१८.१), गथेरु हना (केनिया, १.२१.१).

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनPuneपुणे