शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘रायरेश्वरा’वर स्वच्छता करून भोरमधील दिव्यांगाची सायकलवरून दिल्ली वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 18:00 IST

भोर येथील पोपट जयवंत खोपडे हे अपंग असून स्वच्छता व पर्यावरण बचावाचा संदेश देण्यासाठी रायरेशवर किल्ला (ता. भोर) ते संसद भवन दिल्ली हा सुमारे १,८९३ किलो मीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहे.

ठळक मुद्दे३ डिसेंबर जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून स्वच्छता, पर्यावरण बचाव दिव्यांग संदेश यात्रापोपट खोपडे हे अपंग असूनही किल्ले व ऐतिहासिक स्थळांना घोड्यावरून भेटीलिम्का बुकची टीम राहणार बरोबर, प्रवासादरम्यान वापरल्या जाणार दोन सायकल

भोर : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून भोर येथील पोपट जयवंत खोपडे हे अपंग असून स्वच्छता व पर्यावरण बचावाचा संदेश देण्यासाठी रायरेशवर किल्ला (ता. भोर) ते संसद भवन दिल्ली हा सुमारे १,८९३ किलो मीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहे. त्याची सुरवात त्याने रविवारी रायरेश्वर किल्ल्यावर स्वच्छता करून केली.नवल फाउंडेशन पुणेच्या वतीने ३ डिसेंबरला जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून स्वच्छता व पर्यावरण बचाव दिव्यांग संदेश यात्रा २०१७चे आयोजन करण्यात आले आहे. भोर तालुक्यातील नाझरे येथील पोपट खोपडे हा अपंग तरुण सायकलवरून रायरेश्वर किल्ला ते नागपूर मार्गे संसद भवन दिल्ली, असा सुमारे १,८९३ किलोमीटरचा प्रवास करणार असून वाटेत गावोगावी स्वच्छतेचा संदेश देणार आहे.रविवारी पोपट खोपडे यांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वच्छता करून त्याची सुरुवात केली. त्यानंतर डोंगर उतरून भोर शहरात आल्यावर सम्राट चौकातील क्रांतिस्तंभाची स्वच्छता करून पुष्पहार घालून सायकलवरून प्रवास सुरू झाला. या वेळी नगराध्यक्ष तृप्ती किरवे, माजी सभापती वंदना धुमाळ, सीमा तनपुरे, अ‍ॅड. जयश्री शिंदे, रेखा टापरे, सोपान शिंदे, बंडू खोपडे, राम घोणे, आशा खोपडे, सुनीता बदक उपस्थित होते.

एकूण ५० ठिकाणी मुक्कामदररोज साधारपणे ४० ते ६० किलोमीटरचा प्रवास होणार असून प्रवासात एकूण ५० ठिकाणी मुक्काम करावा लागणार आहे. प्रवासादरम्यान वाटेत असणाºया राष्ट्रीय स्मारकाची स्वच्छता करून लोकांना स्वच्छतेचा संदेश देणार आहेत.२१ डिसेंबरला नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, तर २१ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.महाराष्ट्र मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यांतून सायकलवरून प्रवास होणार असून या सायकल प्रवासासाठी नवल फाउंडेशनने दोन सायकली त्यांना दिल्या आहेत.

विविध विक्रमांवर कोरले नावपोपट खोपडे हे अपंग असूनही त्यांनी यापूर्वी भोर, वेल्हे, पुरंदर तालुक्यातील किल्ले व ऐतिहासिक स्थळांना घोड्यावरून भेटी दिल्या आहेत. प्रवास करून लिम्का बुक आॅफ रेकॉड्स केले आहे. याही वेळी लिम्का बुकची टीम त्यांच्याबरोबर राहणार आहे. सहा महिन्यांपासून त्यांचा पुण्यात सायकल सराव सुरू होता. प्रवासादरम्यान दोन सायकल वापरल्या जाणार आहेत. बरोबर दोन गाड्या असतील. 

टॅग्स :environmentवातावरणPuneपुणेParliamentसंसद