विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचाºयांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:08 PM2017-10-05T16:08:06+5:302017-10-05T16:12:13+5:30

मालवण येथील भंडारी कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वच्छता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता केली. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाºयांनीही सहभाग घेऊन ‘स्वच्छता ही सेवा’ या भावनेने महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून सर्वांना स्वच्छतेचा संदेश दिला.

Teachers, employees, along with students gave cleanliness message | विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचाºयांनी दिला स्वच्छतेचा संदेश

विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचाºयांनी दिला स्वच्छतेचा संदेश

Next
ठळक मुद्देमालवण भंडारी महाविद्यालयाचा उपक्रम ‘स्वच्छता ही सेवा’ मधून परिसराची साफसफाई

मालवण, 5  : मालवण येथील भंडारी कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वच्छता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता केली. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाºयांनीही सहभाग घेऊन ‘स्वच्छता ही सेवा’ या भावनेने महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून सर्वांना स्वच्छतेचा संदेश दिला.


या स्वच्छता उपक्रमात भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचे २७० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरातील पावसामुळे वाढलेली झाडी तोडण्यात आली. तसेच इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. 


या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबर महाविद्यालयाच्या प्राचार्या समिता मुणगेकर, पवन बांदेकर, स्नेहल पराडकर, चंद्रकांत आचरेकर, किशोर पालव, सुनील वस्त आदी सहभागी झाले होते.

मालवण येथील भंडारी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रम राबविला.

Web Title: Teachers, employees, along with students gave cleanliness message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.