शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाचा महापालिकेला दणका :'एचसीएमटीआर' प्रकल्पाला 'ना हरकत' प्रमाणपत्र आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 17:35 IST

पालिकेने 'एचसीएमटीआर' प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पर्यावरण विभागाची एनओसी घेणे बंधनकारक होते.

ठळक मुद्देपर्यावरण विभागाच्या एनओसी शिवाय एचसीएमटीआर करू नये असे स्पष्ट आदेश

पुणे : बहुचर्चित 'हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रोड' (एचसीएमटीआर) या प्रकल्पाच्या कामासाठी पर्यावरण विभागाचे 'ना-हरकत' प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असून प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी ही एनओसी घेण्याचे आदेश राष्ट्रीय हरीत न्याय प्राधिकरणाने (एनजीटी) दिले आहेत. यासंदर्भात प्राधिकरणाकडे याचिका दाखल करण्यात आली होती.

पालिकेच्या १९८७ च्या विकास आराखड्यात या रस्त्याचे नियोजन करण्यात आले होते. तब्बल ३६ किलोमीटर लांब आणि २४ रुंदीचा हा रस्ता शहरातील वाहतुक कोंडीवर पर्याय असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत होता. या प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करावी लागणार आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. पालिकेने याकडे दुर्लक्ष करीत सर्वेक्षण आणि भूसंपादनाची कामे सुरू केली होती. तसेच या प्रकल्पासाठी निविदा प्रकियाही राबविली होती. चढ्या भावाने आलेल्या निविदा अखेर रद्द करण्यात आल्या. तूर्तास हा प्रकल्प बंद आहे. पर्यावरणाची हानी होत असल्याने सारंग यादवाडकर यांच्यासह काहीजणांनी राष्ट्रीय हरीत न्याय प्राधिकरणामध्ये १७ ऑक्टोबर २०१९ रोजी याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे झालेल्या अंतिम सुनावणीमध्ये एचसीएमटीआर प्रकल्प सुरू करण्यापुर्वी पर्यावरण एनओसी घेण्याचे आदेश राष्ट्रीय हरीत न्याय प्राधिकरणाने दिले आहेत. -------पालिकेने एचसीएमटीआर प्रकल्प सुरू करण्यापुर्वी पर्यावरण विभागाची एनओसी घेणे बंधनकारक होते. पूर्वपरवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या प्रक्रियेविरुद्ध एनजीटीमध्ये दाद मागण्यात आली होती. पर्यावरण विभागाच्या एनओसी शिवाय एचसीएमटीआर करू नये असे स्पष्ट आदेश एनजीटीने दिले आहेत. त्यामुळे पालिकेला पुन्हा नव्याने बाधितांकडून हरकती व सूचना प्रक्रिया पार पाडावी लागेल.- सारंग यादवाडकर, याचिकाकर्ते-------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाenvironmentपर्यावरण