माय अर्थ फाउंडेशनतफेर् 'पर्यावरण बंधन सप्ताह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:14 IST2021-08-24T04:14:54+5:302021-08-24T04:14:54+5:30
माय अर्थ फाउंडेशनच्या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत रक्षाबंधनाच्या निमित्ताने 'पर्यावरण बंधन सप्ताहाचे' आयोजन करण्यात आले आहे. ई-कचरा ...

माय अर्थ फाउंडेशनतफेर् 'पर्यावरण बंधन सप्ताह’
माय अर्थ फाउंडेशनच्या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत रक्षाबंधनाच्या निमित्ताने 'पर्यावरण बंधन सप्ताहाचे' आयोजन करण्यात आले आहे. ई-कचरा व प्लास्टीक कच-याचे संकलन करण्याची हि मोहिम असणार आहे. या मोहिमेमध्ये पुण्यातील ७ गणेश मंडळे सहभागी झाली असून याची सुरुवात सदाशिव पेठेतील हत्ती गणपती चौकातील विश्वास सांस्कृतिक मित्र मंडळापासून झाली.
माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, ललीत राठी, पुणे मनपा विभागीय आरोग्य निरिक्षक सुहास पांढरे, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष डांग़े, प्रा. डॉ. गिरिष चरवड, योगेश वाडेकर, यादव पुजारी, महेश चरवड, प्रकाश चव्हाण उपस्थित होते. शिवोदय मित्र मंडळ नवी पेठ, महाराष्ट्र तरुण मंडळ सिटी पोस्ट बुधवार पेठ, श्री अष्टविनायक मित्र मंडळ शुक्रवार पेठ, त्वष्टा कासार गणेशोत्सव मित्र मंडळ कसबा पेठ, स्वामी समर्थ व महाअवतार बाबाजी मठ, नांदेड सिटी, स्वराज्य यज्ञ समुह दत्तवाडी या गणेश मंडळांचा सहभाग पर्यावरण बंधन सप्ताहामध्ये असणार आहे.