शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’ला रेल्वे आवारात ‘एन्ट्री’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 12:22 IST

प्रवाशांच्या सोयीसाठी निर्णय : स्वतंत्र बसथांबा असणार 

ठळक मुद्देपुणे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अनेक प्रवासी शहरात इच्छित ठिकाणी जाण्यासाठी करतात पीएमपी बस, रिक्षा किंवा कॅबचा वापर

पुणे : पुणेरेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या बसला आवारात ‘एन्ट्री’ देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रवाशांना ने-आण करणाऱ्या वाहनांसाठी असलेल्या लेनमधून या बस धावतील. या लेनमध्येच पीएमपीचा स्वतंत्र बसथांबा दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेच्या आवारातूनच बस पकडता येणार आहे. रेल्वे आवारात सध्या कॅब व रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा आहे. त्यासाठी त्यांना स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. तर, प्रवाशांची ने-आण करणाऱ्या खासगी वाहनांसाठी स्वतंत्र लेन आहे. या लेनमध्ये खासगी वाहनांना फार काळ थांबता येत नाही. वाहतूककोंडी टाळण्यासाठी स्थानकाबाहेर सब-वेच्या पुलावरून एक रस्ता थेट रेल्वे आवारात काढण्यात आला आहे. तसेच, पूर्वीचे प्रवेशद्वारही नुकतेच बंद करण्यात आले आहे. पुणे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यापैकी अनेक प्रवासी शहरात इच्छित ठिकाणी जाण्यासाठी पीएमपी बस, रिक्षा किंवा कॅबचा वापर करतात. रिक्षा व कॅब आवारातच उपलब्ध होते; पण बससाठी मुख्य रस्ता ओलांडून किंवा सब-वेमधून काही अंतर पार करावे लागते. प्रवाशांकडे अधिक सामान, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असल्यास ते लांब चालत जाण्याचे टाळत रिक्षा किंवा कॅबचा आधार घेतात. त्यामुळे पीएमपीपासून हे प्रवासी दूर जात होते. आता अशा प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे व पीएमपी प्रशासनाच्या समन्वयातून पीएमपीला रेल्वे आवारात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सोमवारी (दि. १८) बसची रेल्वे आवारातील लेनमधून चाचणी घेण्यात आली. आता मंगळवारपासून या लेनमधून नियमितपणे बस धावतील. पण, काही ठराविक मार्गांवरील बसच या लेनमधून जाणार आहेत. त्यामध्ये कात्रज, कोथरूड, निगडी, आळंदी, वाघोली, तळेगाव, हडपसर आदी ठिकाणांचा समावेश आहे. या भागात जाणाºया प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.............प्रवाशांना रेल्वे स्थानकाच्या आवारातूनच बस उपलब्ध होणार असल्याने त्यांची सोय होणार आहे. याठिकाणी बससाठी स्वतंत्र थांबाही असेल. रेल्वे स्थानकातून ये-जा करणारे अनेक प्रवासी बसचा वापर करतात. प्रवाशांमध्ये वाढ होण्यासाठी पीएमपीला त्याचा फायदा होईल. - नयना गुंडे, अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे