शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

‘बुलेट’ वर एन्ट्री.. अन् विवाह मंडपात शिट्ट्या...नादखुळा.. कडक...लई भारी...चा आव्वाज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 18:29 IST

कोणी हेलिकॉप्टरने मंडपात येतो, कोणी आकाशात विवाह साजरा करतो. अशा अवलियांमध्ये तरुणीही मागे नसतात.

ठळक मुद्देवैवाहिक जीवनाची सुरुवातच धाडसाने केल्याबद्दल तिचे कौतुकही

 केडगाव : विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वांत आनंददायक क्षण असतो. अनेक अवलिये त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करतात. कोणी हेलिकॉप्टरने मंडपात येतो, कोणी आकाशात विवाह साजरा करतो. अशा अवलियांमध्ये तरुणीही मागे नसतात. बुधवारी (दि. २) अशीच एक अवलिया नववधू केडगाव (ता. दौंड) येथे विवाहस्थळी बुलेटवरून अवतरली आणि उपस्थितांना अचंबित करून गेली. तिथे शिट्ट्या आणि. खतरनाक.. नाद खुळा.. एकच नंबर.. अशा कमेंटने वातावरण ढवळून निघाले.. केडगाव येथील वधू कोमल शहाजी देशमुख हिचा गणेश कदम या वराशी नियोजित विवाह बुधवारी होता. सदर विवाह केडगाव येथील घरापासून ३ किलोमीटर लांब आर्यन लॉन्स कार्यालयात होता. स्वत:च्या लग्नात कोमल हिने बुलेटवरून येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. देशमुख कुटुंबीयांनीही मोठ्या मनाने तिच्या या बुलेट सवारीसाठी परवानगी दिली. मग काय! लाल रंगाची साडी, आकर्षक केशभूषा व डोळ्यांवर गॉगल लावून सकाळी नववधू कोमल आपल्या घरापासून विवाह स्थळापर्यंत स्वत: बुलेट चालवीत दाखल झाली आणि स्वत:चे अवलियापण तिने सर्वांना दाखविले. विशेष म्हणजे, आर्यन लॉन्स कार्यालय हे पुणे-सोलापूर महामार्गावर होते. म्हणून वधूने भरधाव वेगाने वाहणाऱ्या रस्त्यावरही साडी घालून तितक्याच सफाईदारपणे बुलेट चालविली. रस्त्यावरील प्रवासीही तिच्या या साहसाला मनापासून दाद देत होते. वधूबरोबर चारचाकी वाहनांचा लवाजमा होता. विवाहस्थळी दाखल होताच वऱ्हाडींनी वधूचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. वैवाहिक जीवनाची सुरुवातच धाडसाने केल्याबद्दल तिचे कौतुकही होत होते. .................लहानपणापासून कोमलला बुलेटची हौस होती. तिने बुलेट छंद जोपासला. घरात मुलगा-मुलगी भेदभाव केला जात नाही. आज सकाळी तिचे बुलटप्रेम दाखविण्याची इच्छा तिने व्यक्त केली. मी तत्काळ त्याला संमती दिली. मला कोमलचा वडील म्हणून अभिमान वाटतो.-शहाजी देशमुख, वरपिता 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीBhigwanभिगवणmarriageलग्नWomenमहिला