उपमुख्यमंत्र्यांच्या 'बारामतीत'च आता उद्योगधंदे सुरु करण्याची मागणी जोर धरू लागलीय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 06:34 PM2020-04-28T18:34:54+5:302020-04-28T18:43:55+5:30

बारामती तालुक्यात सहकारी औद्योगिक वसाहतीसह सर्व भागांतील कारखाने सुरू करावेत..

Entrepreneurs urge Deputy CM to start MIDC in Baramati | उपमुख्यमंत्र्यांच्या 'बारामतीत'च आता उद्योगधंदे सुरु करण्याची मागणी जोर धरू लागलीय

उपमुख्यमंत्र्यांच्या 'बारामतीत'च आता उद्योगधंदे सुरु करण्याची मागणी जोर धरू लागलीय

Next
ठळक मुद्देराज्यात इतर अनेक भागात कारखाने सुरू झाले

बारामती : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनेक कठीण निर्णय घेत आहेत. त्यात संचारबंदी तीव्र करण्याचा देखील आदेश दिला तसेच बारामतीत भिलवाडा पॅटर्न राबवल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आले. पण लॉकडाऊनमध्ये राज्यातील आर्थिक नुकसान भरून येण्यासाठी त्यांनी कोरोनाचा कमी प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी काही नियम आणि अटींसह उद्योगधंदे सुरु करण्याबाबत परवानगी दिली आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत देखील उद्योगधंदे सुरु करण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. यासंदर्भात  बारामती औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू करण्यासाठी उद्योजकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे.  

कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे देश कठीण परिस्थितीतून जात आहे. राज्यात इतर अनेक भागात कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे  बारामती तालुक्यात सहकारी औद्योगिक वसाहतीसह सर्व भागांतील कारखाने सुरू करावेत ,अशी उद्योजकांनी मागणीकेली आहे.
बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने अध्यक्ष प्रमोद काकडे,कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी ही मागणी पवार यांच्याकडे केलीआहे.  बारामती औद्योगिक क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा संलग्न कारखाने सोडता सर्व कारखाने बंद ठेवून आम्ही सर्व उद्योजक आपल्या बरोबर करोनाहटाव मोहिमेत सहभागी झालो आहोत. तसेच आम्ही छोटे उद्योजकांनी मिळुन रुपये दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त रक्कम मुख्यमंत्री करोना सहाय्यक निधीसाठीही दिलेली आहे.
 आपल्या बारामती येथील उद्योजक ही आपले येथील कारखाने कधी सुरू करावयाचे अशी विचारणा करीत आहेत. तरी  आपल्या भागातील कारखाने कधी सुरु करावयाचे यावर आम्हांला सुचित करावे,अशी मागणी करण्यात आली आहे.कारखाने सुरू करावयाची परवानगी देताना सर्व कामगार, अधिकारी व मालक यांना कारखान्यातच राहणे बंधनकारक केले आहे. ही अट अवलंब करून कारखाने सुरू करणे केवळ अशक्य आहे. तरी अत्यावश्यक सेवेच्या कारखाने प्रमाणेच इतर कारखान्यांना ही त्यांचे कामगारांना , अधिकाऱ्यांना व मालकांना कारखान्यात जाणे येणेसाठी कामगार बसशिवाय पुरेसे चार चाकी व दोन चाकी वाहने परवाने देण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे.
———————————————
...उद्योजकांची प्रांताधिकाऱ्यां समवेत बैठक
बारामती एमआयडीसीतील उद्योग सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू करण्यास झाली आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासमवेत उद्योग प्रमोद काकडे,दत्ता कुंभार, धनंजय जामदार, पंढरीनाथ कांबळे, स्वप्नील पाटील, महेशबल्लाळ, एस. बी. पुस्तके, सदाशिव पाटील, अविनाश लगड आदींच्या उपस्थितीतबैठक पार पडली. यावेळी गेल्या ३७ दिवसांपासून बंद असलेली एमआयडीसीतील्कारखान्यांची चाके पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी चर्चा करण्यात आली.उद्योग सुरू करण्याची उद्योजकांची मागणी शासनापर्यंत पोहोचविण्याचेआश्वासन प्रांताधिकारी कांबळे यांनी दिले. उपविभागीय पोलीस अधिकारीनारायण शिरगावकर यांनी उद्योग सुरू करताना आवश्यक दक्षतेबाबत संवादसाधला. दरम्यान ३० एप्रिल या विषयावर पुन्हा बैठक घेण्यात येणार असूनतत्पूर्वी उद्योग सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर नियमावली तयार करण्यातयेणार आहे.हि बैठक यशस्वी झाल्यास १ मे नंतर बारामती एमआयडीसीतील चाकेगतीमान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Entrepreneurs urge Deputy CM to start MIDC in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.