उद्योजकांना जिज्ञासाही हवी

By Admin | Updated: October 7, 2016 03:22 IST2016-10-07T03:22:31+5:302016-10-07T03:22:31+5:30

नवीन उद्योग सुरू करताना जिद्द हवीच. त्याबरोबरच सतत जिज्ञासाही जागी हवी. असा उद्योजक यशाची शिखरे गाठल्याशिवाय राहणार नाही

Entrepreneurs need curiosity | उद्योजकांना जिज्ञासाही हवी

उद्योजकांना जिज्ञासाही हवी

पुणे : नवीन उद्योग सुरू करताना जिद्द हवीच. त्याबरोबरच सतत जिज्ञासाही जागी हवी. असा उद्योजक यशाची शिखरे गाठल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत मुंबईतील आयआयटीच्या संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक डॉ. दीपक पाठक यांनी उद्योजकांना गुरुवारी येथे आवाहन केले.
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रिज अ‍ॅँड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे विविध क्षेत्रांतील उद्योजकांना पारितोषिके, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे होते. चेंबरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, संचालक अनंत सरदेशमुख व्यासपीठावर होते.
संशोधनाबद्दलचे जी. एस. पारखे पारितोषिक मिस्ट रिसोनन्स इंजिनिअरिंग या कंपनीस मिस्ट कूलिंग सिस्टिम या उपकरणाबद्दल देण्यात आले. मकरंद चितळे यांनी तो स्वीकारला. याच शीर्षकाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मल्टिटेक प्रॉडक्ट्सचे अनिल घुबे पाटील यांनी स्वीकारले.
तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक फ्रिक्शन वेल्डिंग टेक्नॉलॉजीजचे यतिन तांबे यांनी स्वीकारला. चवथ्या क्रमांकाचे पारितोषिक युनिव्हर्सल आॅर्बिटल सिस्टिम्सचे आनंद कानडे यांनी स्वीकारला.पाठक यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात उद्योजकांना डिजिटल टेक्नॉलॉजीचा अधिकाधिक वापर करून प्रगती साधण्याचे आवाहन केले.
गोडबोले यांनी अद्ययावत माहिती न ठेवल्यास व विपणनाच्या नवनव्या तंत्राचा वापर न केल्यास उद्योग स्पर्धेत मागे कसे पडतात, हे उदाहरणांसह सांगून माहिती तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात होणाऱ्या उपयोगांची माहिती सांगितली.
या नव्या तंत्रज्ञानामुळे जुने व्यवसाय बंद पडत असून, यू-ट्यूब न फ्ल्पिकार्डसारख्या सुविधांमुळे, आॅनलाइन पुस्तके वाचण्याच्या सुविधेमुळे पुस्तकांची दुकाने बंद होत असल्याचा धोका नमूद केला.
चौधरी यांचेही प्रास्तविक भाषण झाले. सरदेशमुख यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)
अन्य पारितोषिके व विजेते असे
४ हरिमालिनी जोशी पारितोषिक - एन्सेम्बल सिस्टिम्स, मिलिंद कुलकर्णी. रमाबाई जोशी महिला उद्योजक पारितोषिक -लीज ब्युटी सेंटर, लिना खांडेकर. रमाबाई जोशी महिला उद्योजक -इंटरनॅशनल स्कूल आॅफ इस्थेटिक्स, भक्ती सपके.
४बी. जी. देशमुख आयएएस अ‍ॅवॉर्डचे मानकरी १) इंडो गल्फ फर्टिलायझर्स, अभिनव सिन्हा, २)आॅर्लिकोन ब्लेझर्स कोटींग, नचिकेत कणसे, ३)ल्युक इंडिया लिमिटेड, शंतनू घोषाल, ४)सोबा लिमिटेड, अभिनव कांचन, ५)विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट, अमोल गोजे. किरण नातू फर्स्ट जनरेशन उद्योजकता पुरस्कार १) विनित मराठे, २)ओमप्रकाश पेठे, ३)गजानन पाटील. आर. जे. राठी ग्रीन इनिशिएटिव्हज १) जे. बी. केमिकल्स -
श्रीधर जोशी, २)सॅनसेरा इंजिनिअरिंग -जयाकारा शेट्टी.

Web Title: Entrepreneurs need curiosity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.