दक्षिण पुण्यात लॉकडाऊला नागरिकांचा उत`स्फुर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:49+5:302021-04-11T04:10:49+5:30
पोलिसांकडून अनेक ठिकाणी बॅरीकेडिंग करण्यात आली होती. मात्र सकाळी ११ पर्यंत वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये जा सुरू होताच. सहायक ...

दक्षिण पुण्यात लॉकडाऊला नागरिकांचा उत`स्फुर्त प्रतिसाद
पोलिसांकडून अनेक ठिकाणी बॅरीकेडिंग करण्यात आली होती. मात्र सकाळी ११ पर्यंत वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये जा सुरू होताच. सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी परिसराची पाहणी करून आढावा घेतला. दुपारी पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनीदेखील कात्रज भागाला भेट दिली. दरम्यान हा लॉकडाऊन होणार हे माहीत असल्यामुळे नागरिकांनी भाज्या, किराणा आधीच भरला होता. भागातील डेअरी मात्र शासनाने ठरवलेल्या वेळे पेक्षा दीड तास जास्त वेळ म्हणजेच १२.३० पर्यंत सुरू होत्या. पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावरील थोडी फार गर्दीदेखील संपली होती. एकूण शनिवारचा लॉकडाऊन कात्रजकरांनी पाळला. आता आज म्हणजेच रविवारी काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
फोटो ओळ : वीकेंड लॉकडाऊनला कात्रज करांनी उत`स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे नेहमी गजबज असलेल्या कात्रज चौकातील बस थांबे सुन्न पडले होते.