शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
2
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
3
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
4
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
5
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
6
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
7
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
8
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
9
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
10
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
11
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
12
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
13
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
14
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
15
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
16
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
17
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
18
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
19
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
20
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ

‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेच्या तयारीचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 1:03 AM

चैतन्यरूपी सुमनांचा सुगंध पसरविण्यासाठी पुण्यनगरीत गणरायाचे आगमन होत आहे.

पुणे : चैतन्यरूपी सुमनांचा सुगंध पसरविण्यासाठी पुण्यनगरीत गणरायाचे आगमन होत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. श्रीगणेशाच्या स्वागतासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. शहरातील संपूर्ण वातावरण गणेशमय झाले आहे. प्राणप्रतिष्ठापनेसह मिरवणुकीच्या तयारीमध्ये कार्यकर्ते व्यस्त झाले आहेत. गणेश चतुर्थीला गुरुवारी मानाच्या गणपतींची मुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.श्री कसबा गणपतीपुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना गुरुवारी सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर जोशी यांच्या हस्ते अभिनेते सुबोध भावे, वेदमूर्ती प्रकाश दंडगे, बास्केटबॉल संघाच्या कर्णधार शिरीन लिमये, एमआयटीचे राहुल कराड आणि आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. योगेश बेंडाळे यांना श्री कसबा गणपती पुरस्कार तर, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांना अ‍ॅड. भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ८.३० वाजता मिरवणूक निघणार आहे.श्री तांबडी जोगेश्वरी मंडळग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी १० वाजता उत्सव मंडपातून निघणार आहे. न्यू गंधर्व बँडपथक, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल-ताशापथके मिरवणुकीच्या अग्रभागी असतील. दुपारी १२ वाजता गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.श्री गुरुजी तालीम मंडळमानाच्या तिसºया श्री गुरुजी तालीम मंडळातर्फे यंदा काल्पनिक गणेश महाल साकारण्यात आला आहे. दुपारी १२.३० वाजता गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी सुभाष सरपाले यांनी सजविलेल्या फुलांच्या रथातून दहा वाजता निघणाºया मिरवणुकीत नादब्रह्म, गर्जना, शिवरूद्र आणि गुरुजी प्रतिष्ठान ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत.श्री तुळशीबाग मंडळअक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्री तुळशीबाग मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची दुपारी १२.३० वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. विपुल खटावकर यांनी साकारलेल्या काल्पनिक गणेश महालामध्ये गणराय विराजमान होतील. गणपती चौक येथून सकाळी ९.३० वाजता निघणाºया मिरवणूक निघेल.केसरीवाडा गणेशोत्सवकेसरीवाडा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला सकाळी १० वाजता रमणबाग चौकातून सुरूवात होईल. सकाळी साडेअकरा वाजता ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना होईल. प्राणप्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. बिडवे बंधुचे नगारावादन पथक असणार आहे.अखिल मंडई मंडळविशाल ताजणेकर यांनी साकारलेल्या काल्पनिक राजस्थानी महालामध्ये अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजानानाची मूर्ती विराजमान होणार आहे. सकाळी ११. ३० वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.दगडूशेठ हलवाई गणपतीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून १ मिनिटाने होणार आहे. सकाळी ८.३० वाजता फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सव