बालचमूंनी लुटला जादूचा आनंद
By Admin | Updated: May 10, 2017 04:16 IST2017-05-10T04:16:19+5:302017-05-10T04:16:19+5:30
जादू हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा व कुतूहलाचा विषय असतो. जादूचे प्रयोग पाहताना सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झालेली असते.

बालचमूंनी लुटला जादूचा आनंद
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जादू हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा व कुतूहलाचा विषय असतो. जादूचे प्रयोग पाहताना सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झालेली असते.
लहान मुलांच्या मनातील जादूबद्दलची उत्सुकता ओळखून लोकमत बालविकास मंच व संजय घोडावत ग्रुप यांच्यातर्फे जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या प्रयोगाचे आयोजन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सहप्रायोजक रोझरी स्कूल अँड कॉलेज हे होते.
लहान मुले व पालक यांनी मोठ्या प्रमाणावर जादूचे प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती. जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी फ्लाइंग बॉक्स-कीप बॉक्स, मास्टर्स आॅफ प्रेडिक्शन, पॉवर आॅफ आय, गिलोटीन, गंगेची प्राप्ती, हुदनी बॉक्स यासारखे जादूचे प्रयोग प्रेक्षकांसमोर सादर केले.
प्रेक्षकांनीदेखील त्यांना टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिसाद दिला. त्यातील काही आवडीच्या प्रयोगांना प्रेक्षकांनी, वन्स मोअरची दादही दिली. संमोहन विद्येचा वापर करून जादूगार प्रेक्षकांना कितीही वेळ खिळवून ठेवू शकतो, याचा प्रत्यय जादूचे प्रयोग पाहताना सर्वच प्रेक्षकांना येत होता. जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी मिस्टरीज बॉक्स आॅफ फिजी आणि कटिंग मॅन टू हाफ या परदेशातील जादूच्या प्रयोगांसोबतच अरेबिक जादूचे नमुनेही प्रेक्षकांना दाखविले. जादूच्या या प्रयोगांचा लहानग्यांबरोबरच पालकांनीही मनमुराद आनंद
लुटला.