अभियंत्याचा खून
By Admin | Updated: May 31, 2014 07:11 IST2014-05-31T07:11:31+5:302014-05-31T07:11:31+5:30
हिंजवडीच्या इन्फोसिस कंपनीतील वरुण सुभाष सेठी (वय ३४, रा. भटिंडा, पंजाब) या संगणक अभियंत्याची गुरुवारी रात्री खून करण्यात आला

अभियंत्याचा खून
वाकड : हिंजवडीच्या इन्फोसिस कंपनीतील वरुण सुभाष सेठी (वय ३४, रा. भटिंडा, पंजाब) या संगणक अभियंत्याची गुरुवारी रात्री खून करण्यात आला. मारुंजी-हिंजवडी रस्त्यावर पेराडाइज सोसायटीसमोरील झाडाखाली त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुणच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्याच्या पाठीवरील बँगेत इन्फोसिस कंपनीचे ओळखपत्र, एटीएम कार्ड, टॅब हे साहित्य मिळाले. प्राथमिक अंदाजानुसार वरुणला मोटारीमध्ये जबरदस्तीने बसवून त्याच्यावर वार करण्यात आले आणि आसपास कोणी नसल्याचे पाहून निर्जन ठिकाणी मृतदेह टाकून देण्यात आला असावा किंवा चोरीच्या उद्देशाने मारहाण केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. मूळचा पंजाबचा असलेला वरुण सध्या कुठे राहत होता, हे समजले नाही. काही दिवसांपूर्वीच हिंजवडीत आला होता. (वार्ताहर)