लाच मागणाऱ्या अभियंत्यास अटक

By Admin | Updated: July 18, 2014 03:39 IST2014-07-18T03:39:52+5:302014-07-18T03:39:52+5:30

नवीन वीज जोड देण्यासाठी व त्यासाठीचे कोटेशन देण्यासाठी ९ हजारांची लाच घेणा-या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मुद्देमालासह पकडले

Engineer seeking bribe | लाच मागणाऱ्या अभियंत्यास अटक

लाच मागणाऱ्या अभियंत्यास अटक

पुणे : नवीन वीज जोड देण्यासाठी व त्यासाठीचे कोटेशन देण्यासाठी ९ हजारांची लाच घेणा-या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मुद्देमालासह पकडले. त्याला अटक करण्यात आली आहे.
नंदेश माधवराव माने (वय ५२, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे अटक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने फिर्याद दिली आहे. हा कार्यकर्ता लोकांना वीज जोडणीसंबंधीच्या कामामध्ये मदत करतो. त्यांच्या ओळखीच्या एकाच्या घरी वीजजोडणी करायची होती. हे काम त्याने माने यांना सांगितले. या कामासाठी माने याने १० हजारांची मागणी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शास्त्रीनगर येथे असलेल्या महावितरणच्या कार्यालयात सापळा लावला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Engineer seeking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.