नाबार्डच्या रकमेचा अपहार करणा:याविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 19, 2014 23:49 IST2014-06-19T23:49:22+5:302014-06-19T23:49:22+5:30

निधीची रक्कम परत करण्याऐवजी तिचा अपहार करणा:या महिलेविरुद्ध नाबार्डने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Enforcement of NABARD amount: Filing a complaint against | नाबार्डच्या रकमेचा अपहार करणा:याविरुद्ध गुन्हा दाखल

नाबार्डच्या रकमेचा अपहार करणा:याविरुद्ध गुन्हा दाखल

>पुणो : स्वयंसेवी संस्थेसाठी मंजूर झालेला निधी चुकून भलत्याच खात्यात जमा झाला. निधीची रक्कम परत करण्याऐवजी तिचा अपहार करणा:या महिलेविरुद्ध नाबार्डने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
राजेश्वरी दिलीप पाचे (रा. साईनगर, मरारटोली, गोंदिया) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुनील कृष्ण जहागीरदार (वय 49, रा. निवेदिता गार्डन, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. जहागीरदार हे नाबार्डमध्ये सहायक व्यवस्थापक आहेत. नाबार्डच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील सोशल अॅक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट या स्वयंसेवी संस्थेला 8 लाख 21 हजार 1क्क् रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पामध्ये आदिवासींसाठी फळबागा स्थानिक केल्या जाणार होत्या. 2क्11मध्ये मंजूर झालेला हा निधी 31 जुलै 2क्12 रोजी या संस्थेच्या खात्यावर जमा करण्यात येणार होता; परंतु नजरचुकीने तो पाचे यांच्या खात्यावर जमा झाला. 
या महिलेने ही रक्कम पुन्हा नाबार्डला परत करण्याऐवजी वेळोवेळी खात्यामधून काढून घेतली, तसेच खर्च केली. तोर्पयत ही बाब नाबार्डच्या लक्षात आलेली नव्हती. निधी मिळालाच नसल्यामुळे संस्थेने मार्चमध्ये नाबार्डला पत्रव्यवहार करून निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर नाबार्डने शोध घेतला असता ही 
रक्कम पाचे यांच्या खात्यावर 
जमा झाल्याचे लक्षात 
आले. या संदर्भात 
कागदोपत्री खातरजमा झाल्यावर जहागीरदार यांनी पोलिसांकडे 
फिर्याद दाखल केली.(प्रतिनिधी)

Web Title: Enforcement of NABARD amount: Filing a complaint against