शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वाळूमाफियांवर अखेर कारवाईचा बडगा, अधिका-यांचे बांधलेले हात सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 03:06 IST

अखेर अधिका-यांनी बांधलेले हात सोडले... आणि वाळूमाफियांवर कारवाई सुरू झाली. शिरूर तालुक्यातील वाळूउपसा व वाहतुकीच्या विरोधात महसूल प्रशासनाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली.

टाकळी हाजी : अखेर अधिका-यांनी बांधलेले हात सोडले... आणि वाळूमाफियांवर कारवाई सुरू झाली. शिरूर तालुक्यातील वाळूउपसा व वाहतुकीच्या विरोधात महसूल प्रशासनाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली.टाकळी हाजी येथे जेसीबी मशीन, ट्रॅक्टरसह सुमारे ६० ब्रासचा अवैध वाळूसाठा जप्त केला आहे. ‘लोकमत’ने या विरोधात आवाज उठवला होता. सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले. त्यामुळे वाळूतस्करांना मात्र मोठा धक्का बसला आहे.वाळूउपशामुळे रस्ते खराब झाले असून अवैध वाळूउपशाचा गोरखधंदा राजरोस सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत होते. वाळूमाफियांवर कठोर कारवाई व्हावी व अवैध वाहतुक बंद करावी या बाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला होता.त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ राव, उपविभागिय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दखल घेत कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार तहसीलदार रणजित भोसले यांच्यासह पोलीस पथकाने कारवाई करीत कुकडी नदी काठी धडक कारवाई केली.गेल्या महिनाभरापासून वाळूमाफिया शेतात वाळू काढत होते. तहसीलदार रणजित भोसले यांच्या पथकाने खासगी वाहनामधे येऊन ही कारवाई केली.नोटिसा काढून दंड आकारणारतहसीलदार भोसले म्हणाले, की गेल्या चार-पाच महिन्यांत जे वाळूचोरीचे पंचनामे झाले आहेत त्यांना नोटिसा काढून दंड केला जाईल. जे दंड भरणार नाहीत त्यांच्या जमिनीवर बोजा चढविला जाईल.कवठे येमाईत मोठे अवैध साठेअद्याप कवठे येमाई परिसरात अनेक ठिकानी वाळूसाठे असून त्यांचे तसेच उत्खनन केलेल्या जमिनीची पाहणी करून पंचनामे करण्यात येतील, असे प्रांत भाऊसाहेब गलांडे यांनी सांगितले.तहसीलदारांनी दिली वाळूमाफियांना हुलकावणीव्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे वाळूतस्कर व त्यांचे खबरे एकमेकांना अपडेट करीत असतात. कारवाई होण्याची कुणकुण लागताच ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वरून अपडेट केले जाते आणि सर्वजण सावध होतात. मात्र या वेळी तहसीलदारांनी त्यांना हुलकावणी देत खासगी वाहनाचा वापर करून ही कारवाई केली त्यामुळे ही कारवाई यशस्वी होऊ शकली.मुरूममाफियांचा रात्रीस खेळ चालेचाकण : चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये गॅसवाहिनीचे पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. याकरिता रस्त्याजवळ खोल खोदाई करून पाइप टाकले जात आहेत. यातून निघत असलेला हजारो ब्रास मुरुम परिसरातील कंपन्यांच्या भरावासाठी टाकला जात आहे. महसूल खात्याची फसवणूक करून लाखो रुपयांचा मलिदा संबंधित ठेकेदार खात आहे. रात्रीच्या वेळी मुरुम वाहतूक सुरू आहे. येथील ७५ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कडेने गॅसवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम तालुक्यातील एका राजकीय पक्षाचा बडा नेता करीत आहे.या भागातील गॅसवाहिनी टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून किरकोळ काम सुरूअसल्याची स्थिती आहे. परंतु शासकीय काम सुरू आहे, असे भासवून या ठेकेदाराने याकामात निघालेला हजारो ब्रासमुरुम परस्पररीत्या परिसरातीलकंपन्या आणि उद्योजकांना विकण्याचा धडाका चालविला आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी हा मुरुम चोरून वाहतुकीवर भर दिला जात आहे.प्रशासन लक्ष देईना, कारवाईदेखील होईनाऔद्योगिक भागात अनेक उद्योजकांनी जागा घेतल्या असून त्यांना येथील एका बड्या नेत्याकडून मोठ्या प्रमाणात हा सरकारी जागेतील मुरुम चोरून पुरविला जात आहे. हायवा, मोठे डंपर यांसारखी वाहने त्यासाठी वापरली जात आहेत. प्रमाणापेक्षा जास्त लोड भरून ही वाहतूक केली जात असल्याने नव्याने बनविलेल्या डांबरी रस्त्याचे या वाहतुकीने तीन तेरा वाजले आहेत. महसूल प्रशासन आणि एमआयडीसीचे अधिकारी या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करीत आहेत, असा आरोप केला जात आहे. 

टॅग्स :Puneपुणे