शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शिक्षणबाहय घटनांच्या गदारोळात सरले कुलगुरूंचे पहिले वर्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 9:16 PM

विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांची चांगली माहिती असल्याने, ते सोडविण्याच्या दृष्टीने दमदार पावले उचलली जातील अपेक्षा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त करण्यात आली होती.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : कुलगुरूंच्या कार्यकाळाची वर्षपूर्ती आरोग्य केंद्राची दुरावस्था दूर करण्याचे काम अंतिम टप्प्यात प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्यावर भर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वेबमेल हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्या जाणे, दिग्दर्शक नागराज मंजुळे यास बेकायदेशीरपणे मैदान भाडयाने देणे, माहिती अधिकाराची योग्यप्रकारे अंमलबजावणी न करणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सवात विद्यार्थ्यांनी सहभागी न होण्याचे परिपत्रक, शाकाहारी विद्यार्थ्यांनाच सुवर्णपदक देण्याची वादग्रस्त अट, आदी शिक्षणबाहय घटनांच्या गदारोळात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे पहिले वर्ष संपले आहे. केंद्र शासनाकडून विद्यापीठाला स्वायत्तेचा दर्जा मिळणे, एनआरएफमध्ये एका अंकाने वरची रँकिंग आदी सकारात्मक बाबी या काळात घडल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमळकर यांच्या नियुक्तीला गुरूवारी एक वर्ष पूर्ण झाले. एमएचा विद्यार्थी ते प्राध्यापक अशी सलग ३५ वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच घालवलेल्या डॉ. करमळकर यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांना विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांची चांगली माहिती असल्याने, ते सोडविण्याच्या दृष्टीने दमदार पावले उचलली जातील अपेक्षा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त करण्यात आली होती.  चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना विद्यापीठाचे मैदान भाडयाने देण्याचा कुलगुरुंचा निर्णय सर्वाधिक वादग्रस्त ठरला. कायद्याचे उल्लंघन करून मंजुळे यांना मैदान भाडयाने देण्यात आले. सुरूवातीला ४५ दिवसांसाठी मैदान भाडयाने दिले असताना ६ महिने उलटले तरी अद्याप चित्रपटाचा सेट मैदानावर जैसे थे आहे.  विद्यापीठाचा वेबमेल हॅक करून इंजिनिअरींगच्या दोघा विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका फोडल्याचा गंभीर प्रकार नुकताच उजेडात आला आहे. यापार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेतील या त्रुटी दूर करण्याचे आव्हान कुलगुरूंसमोर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणूकाच करण्यात आलेल्या नाहीत. माहिती अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी कुलसचिवांकडून दरमहा अतिरिक्त मानधन घेतले जात आहे आदी गंभीर बाबी उजेडात येऊनही त्याविरोधात अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. एनआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाच्या स्थानात एक अंकाने सुधारणा होऊन विद्यापीठाला नववे स्थान प्राप्त झाले आहे. केंद्र शासनाकडून विद्यापीठाला स्वायत्तता दर्जा बहाल, राज्यपालांच्या सुचनेनुसार संलग्न महाविद्यालयांनी स्वायत्ता घ्यावी यासाठी पुढाकार घेतला जात आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यात यश येताना दिसत आहे. नाशिक आणि नगर उपकेंद्रांना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. आरोग्य केंद्राची दुरावस्था दूर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आदी सकारात्मक बाबीही गेल्या वर्षभरात घडल्या. .............नव्या बदलांऐवजी ‘जैसे थे’ ची भूमिका नवीन कुलगुरूंच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनात सुधारणा करण्यासाठी चांगले बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र डॉ. नितीन करमळकर यांनी जुन्या व्यवस्थामध्ये कोणतेही बदल न करण्याचे धोरण स्वीकारले. प्रभारी अधिष्ठाता, संचालक, प्रशासनाचे प्रमुख आदींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. परीक्षा विभाग, निवडणूक विभाग आदीमधील त्रुटी, कपाऊंडवर कोटयावधी रूपयांची उधळपट्टी, माहिती अधिकाराची योग्यप्रकारे अंमलबजावणी न होणे आदीबाबत ठोस कारवाई झाली नाही.   प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्यावर भरसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये माध्यम समन्वय कक्ष स्थापन करून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सकरात्मक पाऊल उचलले. मात्र प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कमी भेटण्याचा शिरस्ता त्यांनी सुरूवातीपासून अवलंबला.

टॅग्स :Puneपुणेnitin karmalkarनितीन करमळकरuniversityविद्यापीठ