शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मालोजीराजे गढी अतिक्रमण; समाधीस्थळ दुरावस्थेबाबत पडळकरांच्या नेतृत्वखाली सकल हिंदू समाजाने उठवला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:34 IST

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तब्बल अडीच तास चाललेले रास्ता रोको आंदोलन स्थगित

इंदापूर: वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर पुन्हा मेघडंबरीसह समाधी उभारण्यात यावी अशी सूचना प्रशासनाला दिल्याचे असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भ्रमणध्वनीवरून दिली. त्यानंतर आ. गोपीचंद पडळकर, सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गलांडवाडी पाटीवर तब्बल अडीच तास केलेले रास्ता रोको आंदोलन सकल हिंदू समाजाने स्थगित केले.    वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमण काढण्यात यावीत या मागणीसाठी व महामार्गाचे रुंदीकरण, उड्डाणपूलाच्या बांधकामामुळे वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आ.गोपीचंद पडळकर, सागर बेग व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महामार्गावरील गलांडवाडी पाटी येथे आज सकाळी साडेअकरा वाजता रास्ता रोको करण्यात आला.    पडळकर म्हणाले, विशाळगड, प्रतापगड गडाच्या धर्तीवर वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील सर्वच्या सर्व अतिक्रमण काढली जावीत. वीरश्री सरदार मालोजी राजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धनाचा आराखडा कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना दाखवणे आवश्यक होते. हजरत चाँदशाहवली यांचा दर्गा वेगळा ठेवण्यात यावा. मालोजीराजे भोसले यांची गढी व दर्गा यामध्ये भिंत बांधण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. पुणे जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी शासकीय जागांवर बांधण्यात आलेले बेकायदेशीर दर्गाह तोडण्यात यावेत अशी मागणी ही त्यांनी केली.

 दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांशी झालेल्या चर्चेनुसार, गढीच्या परिसराची मोजणी करुन सीमांकन व हद्द निश्चित होत नाही. तोपर्यंत त्या ठिकाणच्या दुरुस्ती व सुशोभकरणाचे कामकाज थांबवण्याची सूचना संबंधित यंत्रणेस दिली आहे. दि.२९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी गढीची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. तेथे मागण्यांच्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाही करणयाबाबत चर्चा केली जाईल, असे पत्र तहसीलदार जीवन बनसोडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरGopichand Padalkarगोपीचंद पडळकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणcollectorजिल्हाधिकारी