शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

वनजमिनीवरील अतिक्रमण काढले; सतरा एकर जमीन मोकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:42 IST

वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम वन विभागाने राबविली.

बिजवडी : येथील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम वन विभागाने राबविली. सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याबरोबर इंदापूर व बारामती तालुक्यांतील वनपरिमंडल अधिकारी, वनरक्षक व वनमजूर तसेच राज्य राखीव पोलीस बलाची तुकडी व जेसीबी यंत्राच्या साह्याने अतिक्रमण झालेल्या जमिनीवरील उभी पिके जमीनदोस्त करण्यात आली.नुकत्याच झालेल्या कारवाईत सुमारे १७ एकर वनजमीन मोकळी करण्यात आली. वर्षभरापासून तालुक्यातील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही धडक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत तालुक्याच्या दहा गावांतील अतिक्रमित वनक्षेत्र रिकामे करण्यात आले असून, यापुढील काळात मोठी कारवाई करण्यात येईल, असे सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग यांनी सांगितले.उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वनजमिनीचे सर्वेक्षण करून सीमांकन व हद्द निश्चित झाल्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्यातील दोनशे एकरांहून अधिक जमिनीची हद्द निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वनजमिनीत विविध कारणांसाठी केलेली अतिक्रमणे स्वत:हून काढावीत, असे आवाहन इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी केले.या कारवाईमध्ये द्राक्ष, पपईच्या बागा, मका पिकासारखी पिके जमीनदोस्त करण्यात आली. याचबरोबर, या कारवाईचा फटका कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याच्या मळी टाकण्याच्या ठिकाणालाही बसला. मळी टाकण्यासाठी कारखान्याकडून वापरण्यात येत असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रात प्रवेश होऊ नये, अशी चारी खोदून वहिवाट बंद करण्यात आली. पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकºयांच्या डोळ्यांत पाणी तरळल्याचे दिसून येत होते.शेतजमिनीच्या अतिक्रमणा बरोबरच वनविभागाच्या अधिकाºयांनी तालुक्यातील उद्योगधंद्यांचेदेखील वनविभागातील अतिक्रमण तातडीने काढावे. जर वनविभाग शेतकरी आणि उद्योजकयांच्यात दुजाभाव करत असेल तर आम्ही शेतकºयांवर होणाºया अन्यायाच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत.- नीलेश देवकरजिल्हाध्यक्ष, रयत क्रांती शेतकरी संघटना

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणforestजंगलPuneपुणे