मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे
By Admin | Updated: December 21, 2014 00:00 IST2014-12-21T00:00:40+5:302014-12-21T00:00:40+5:30
आजची पिढी खूपच फास्ट असून मुुलांच्या गुणवत्ता जपण्याचा पुरेपुर प्रयत्न शाळांनी केला पाहिजे, स्नेहसंमेलनांमधूनच हा वाव मिळत असतो, असे मत अभिनेत्री श्रृती मुराठे यांनी व्यक्त केले.

मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे
बावधन : आजची पिढी खूपच फास्ट असून मुुलांच्या गुणवत्ता जपण्याचा पुरेपुर प्रयत्न शाळांनी केला पाहिजे, स्नेहसंमेलनांमधूनच हा वाव मिळत असतो, असे मत अभिनेत्री श्रृती मुराठे यांनी व्यक्त केले.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंंकल इग्लिंश मेडीयम स्कूलच्या १० व्या वर्धापनदिना निमित्त शाळेत स्रेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी शालीनी कडू, तहसिलदार तृप्ती कोलते पाटील उपस्थित होत्या. स्रेहसंमेलनाचे उद्घाटन जि. प. माजी सभापती लक्ष्मीबाई सातपुते, उद्योजक दिनेश चौधरी, बाळासाहेब ढोकळे यांनी केले. यावेळी नगरसेविका पुष्पा कनोजिया, विजया बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापिका वृशाली देशमुख, स्रेहसंमलेनाचे आयोजक संस्थेचे चेअरमन राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, माजी सरपंच नंदकुमार दगडे, उद्योजक संदिप ढमढेरे, प्रल्हाद सायकर, भानुदास अमराळे, दिलीप पारखी, मुख्याध्यापिका माधुरी काकाडे, मनीषा जाधव, अपर्णा भोसले, ऋचीरा खानविलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अभिनेत्री श्रृती मराठे पुढे म्हणाल्या, माझ्या चित्रपट जिवनाची सुरुवात मी शाळेत असताना स्रेह-संमेलनातून झाली, म्हणूनच दहावीला असताना मला स्मिता तळवलकर यांच्या पेशवाई या मालिकेत पहिल्यांदाच भुमिका मिळाली. आपल्या चिमुकल्यांनी सहभाग घेतल्यावर कार्यक्रमात जरी नुसते हात पाय हलविले तरी पालकांचा आनंद हा गगनला भिडणारा असतो. त्यातही आपल्या पाल्याचे कौतुक होणे हे त्याहूनही जास्त मोठे आनंदांचे असते.
मनीषा जाधव यांनी स्वागत केले. नगरसेविका पुष्पा कनोजिया, संचालिका रेखा बांदल यांची भाषणे झाली.जितेंद्र गोळे, प्राची पास्ते आणि पूनम पांढरे यांनी सुत्रसंचलन केले. अपर्णा भोसले यांनी आभार मानले. (वार्ताहर)
शालेय जीवनातच
मुलांची खरी प्रगती
४शालेय जीवनातच मुलांच्या जीवनाला कलाटणी मिळते, त्यामुळे खरी प्रगती येथूनच होते. सध्याच्या काळात मुलांना मिळणाऱ्या सुखसोयी आमच्या काळात नव्हत्या. परंतु पेरिविंंकल शाळेने मुलाच्या प्रगतीसाठी खूपच मोठी तयारी केली आहे. असे यावेळी तहसिलदार तृप्ती कोलते यांनी सांगीतले.