शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: पुण्यातील स्वारगेट एसटी स्टॅन्डवर कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 17:33 IST

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे. या मागणीसाठी संप पुकारला आहे

पुणे : राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे. या मागणीसाठी संप पुकारला आहे. राज्य सरकार त्यावर योग्य मार्ग काढणार असल्याचे सांगूनही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून ९०० पेक्षा जास्त कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. तरीही कर्मचाऱ्यांनी संप सुरु ठेवला आहे. अनेक जिल्ह्यात या मागणीसाठी संपाबरोबरच आंदोलनही केले जात आहे. पुण्यात काल कर्मचाऱ्यांकडून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. तर आज सकाळी त्यांनी मुंडन करून आंदोलनाला सुरुवात केली आहे. 

आज कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात एसटीला जवळ जवळ ७,९५१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यात आता संपामुळे एसटी महामंडळाचा संचित तोट्याचा आकडा हा साडेबारा हजार कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप आता चांगलाच चिघळला असून राज्यात बुधवारी दिवसभरात २५० आगारांपैकी २५०  आगार बंद पडले आहेत. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सरासरी १०० कोटी रुपयांचा फटका एसटीला बसला. तर संपामुळे दररोज १३ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाचा गाडा पूर्वपदावर येत असतानाच ऐन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे दररोज १३ कोटींचे नुकसान होत आहे. या संपामुळे एसटीचा संचित तोटा हा तब्बल साडेबारा हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. तर कर्मचारी संपामुळे बुधवारी एसटीचे २५० पैकी २५० आगार बंद होते.

मनसे कायदेशीर लढा देतंय

जेव्हापासून हा विषय सुरु आहे तेव्हापासून मनसेचे वकील संपाच्या बाजूने लढत आहेत. एसटी कामगारांच्या संपात मनसे सहभागी आहेत. कायदेशीर लढाई मनसे लढत राहणार आहे. राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेदना ऐकून घेतल्या. सुरुवातीला २८ संघटनांनी मिळून हा संप जाहीर केला. परंतु आता सगळ्या संघटना बाजुला ठेऊन स्वत: कर्मचारी रस्त्यावर उतरला आहे. एसटी महामंडळाचं विलिनीकरण करावं ही प्रमुख मागणी आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १२ आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकारने इतर सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन दिलं जातं तितकचं वेतन कर्मचाऱ्यांना द्यावं असं शिष्टमंडळाने म्हणणं मांडलं आहे. मनसे कामगारांच्या पाठिशी ठाम असून या विषयावर राज ठाकरे जातीनं लक्ष घालणार असल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेST Strikeएसटी संपSwargateस्वारगेटGovernmentसरकार