'पीएसआय'साठी मैदानी चाचणी केली पात्र ; राज्य सेवा परीक्षेसाठी 'सीसॅट'कधी पात्र करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 11:20 PM2021-06-02T23:20:00+5:302021-06-02T23:20:02+5:30

यूपीएससीचे अनुकरण करण्यात एमपीएसी का थांबली?स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांचा प्रश्न 

Eligible for field test for PSI; When will C SAT qualify for State Service Examination? | 'पीएसआय'साठी मैदानी चाचणी केली पात्र ; राज्य सेवा परीक्षेसाठी 'सीसॅट'कधी पात्र करणार ?

'पीएसआय'साठी मैदानी चाचणी केली पात्र ; राज्य सेवा परीक्षेसाठी 'सीसॅट'कधी पात्र करणार ?

googlenewsNext

- अमोल अवचिते
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) कडून घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी मैदानी चाचणी पात्र करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर राज्य सेवा परीक्षेसाठी पूर्व परीक्षेला असणारा सीसॅट हा पेपर कधी पात्र करणार ?, असा प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे.   

एमपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षा पद्धतीचे अनुकरण करते. त्याप्रमाणे एमपीएससीने यूपीएससीच्या धर्तीवर सीसॅट पेपर लागू केला. तसेच काही दिवसांपूर्वी यूपीएससी प्रमाणे परीक्षा देण्यावरही मर्यादा घातल्याचा निर्णय घेतला. यूपीएससीने लागू केलेल्या सीसॅट पेपरमुळे ग्रामीण भागातील उमेदवारांचे नुकसान होत असल्याचे कारण पुढे करून उमेदवारांनी विरोध केला. त्यानुसार अरुण निगवेकर आणि अरविंद कुमार या दोन समित्या स्थापन करून सीसॅट केवळ पात्र करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर एमपीएससीने विचार करून वेळीच सीसॅट पात्र करावे, अशी मागणी गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र सीसॅटच्या निर्णयाचे अनुकरण करण्यासाठी एमपीएसी का थांबली आहे ?, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. 

स्पर्धा परीक्षेत समान संधी असणे आवश्यक आहे. सीसॅट पेपरचे गुण ग्राह्य धरून मुख्यपरीक्षेसाठी निवड केली जाते. यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना याचा फटका बसत असून नुकसान होत आहे. त्यामुळे समसमान संधीचे धोरण येथे लागू होत नाही. विशिष्ठ शाखेतीलच उमेदवारांना याचा फायदा होत आहे. सीसॅट पात्र करण्याच्या निर्णयात नेमके कोण आडकाठी करीत आहे. याचा शोध घेण्याची गरज असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.


पाच वर्षापासून मागणी करण्यात येत आहे. नेमके याच मुद्यावर युपीएसीचे अनुकरण एमपीएससी करत नाही. सामान्य अध्ययन पेपर मध्ये अपेक्षित गुण असून केवळ सीसॅट पेपर मद्ये काही गुण कमी पडल्याने मुख्य परीक्षा देता आली नाही.-

ज्योतीराम जाधव, परीक्षार्थी. 

.....

सीसॅट पात्र करावा असे अनेक स्पर्धा परीक्षेतील तज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार आम्ही एपीएसीला अनेकवेळा मागणी केली आहे. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने निर्णय घेणे आवश्यक आहे.  
  महेश बडे, एमपीएससी स्टुडंट राईट्स. 

Web Title: Eligible for field test for PSI; When will C SAT qualify for State Service Examination?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.