बेलसरच्या मराठा युवतींचा आरक्षणासाठी एल्गार, सासवडला आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:38 IST2018-09-27T00:37:51+5:302018-09-27T00:38:02+5:30
सासवड येथील शिवतीर्थावर पुरंदरमधील सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत लक्षणीय ठिय्या आंदोलनाच्या ४८ व्या दिवशी बेलसरमधून मराठा बांधवांनी बैलगाड्यांची रॅली काढण्यात आली.

बेलसरच्या मराठा युवतींचा आरक्षणासाठी एल्गार, सासवडला आंदोलन
सासवड : येथील शिवतीर्थावर पुरंदरमधील सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत लक्षणीय ठिय्या आंदोलनाच्या ४८ व्या दिवशी बेलसरमधून मराठा बांधवांनी बैलगाड्यांची रॅली काढत आणि यामध्ये महिलांनीही लक्षणीय उपस्थिती दाखवत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या वेळी छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजीमहाराजांच्या जयघोषाने शिवतीर्थ दणाणून गेले.
आरक्षणामुळे गुणवत्तेकडे पाहिले जात नाही. त्यामुळे मराठा समाजातील मुला-मुलींना शिक्षणाची दारे बंद झाली असून समता, बंधुता असणाऱ्या देशात हीच काय समता? असा प्रश्न उपस्थित करीत आता मराठा समाज एकत्र आला असून शासनाने समाजाच्या लाखोंच्या मोर्चाची व आंदोलनाची दखल घेऊन त्वरित आरक्षण द्यावे, मराठा समाजाला शैक्षणिक व इतर आरक्षण दिल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही, असे मत व्यक्त केले.
अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पहिले बलिदान देणाºया मराठा महासंघाचे संस्थापक आमदार अण्णासाहेब पाटील यांची २५ सप्टेंबर रोजी ८५ वी जयंती आंदोलनस्थळी साजरी करण्यात आली. आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी संकल्पना त्यांनी सुमारे ८० च्या दशकात मांडली होती. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन
करण्यात आले.