शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, पहिल्या फेरीत ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 4:37 AM

पुणे व पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील आॅनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेची प्रथम गुणवत्ता यादी गुरुवारी सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात आली.

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील आॅनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेची प्रथम गुणवत्ता यादी गुरुवारी सकाळी अकरा वाजताजाहीर करण्यात आली. त्यानुसार कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी या शाखेत पहिल्या फेरीतून ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून यात प्रथम पसंतीक्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार १८९ एवढी आहे. तर ३३ हजार ९७८ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळवता आलानाही. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकरिता यावर्षी ७५ हजार ९३९ अर्ज प्राप्त झाले होते.कला, विज्ञान,वाणिज्य व एमसीव्हीसी शाखा (मराठी व इंग्रजी माध्यम) यांची पहिल्या फेरीनुसार सर्वाधिक प्रवेश विज्ञान शाखेत झाले असून त्याची ते १८६३८ इतके आहेत. त्या पाठोपाठ वाणिज्य (इंग्रजी माध्यम) ११९३८, वाणिज्य (मराठी माध्यम) ६००१, कला शाखा (मराठी माध्यम) ३०८८, कला (इंग्रजी माध्यम) १४७२ आणि एमसीव्हीसी ३२८ (इंग्रजी माध्यम), ४२६ (मराठी माध्यम) विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.शाखानिहाय वर्गीकरण केल्यास सर्वाधिक अर्ज विज्ञान शाखेकरिता आले असून त्याची संख्या ३२ हजार ७५९ आहे. यानंतर अनुक्रमे वाणिज्य (इंग्रजी) २४३१५, वाणिज्य (मराठी) ११६४१, कला (मराठी) ४६९६, कला (इंग्रजी) २३३७, एमसीव्हीसी (मराठी) ७८, इंग्रजी माध्यमात ११३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सूचनाआपल्या कनिष्ठ महाविद्यालयात आॅनलाईन अलॉट झालेल्या यादीप्रमाणे विद्यार्थी व पालक महाविद्यालयात आल्यानंतरच त्यांचे प्रवेश नियोजित वेळेत आॅनलआआॅईन अपलोड करणे आवश्यक आहे.विद्यार्थी किंवा पालक महाविद्यालयात प्रवेशासाठी न आल्यास आवश्यक ती कागदपत्रे सादर न करताच कोणत्याही विद्यार्थ्याला परस्पर आॅनलाईन अ‍ॅडमिट करू नये.विद्यार्थी / पालक यांचा प्रवेश घेणेबाबतचा निर्णय निश्चित असेल तरच आवश्यक कागदपत्रे घेऊन (उदा. मूळ दाखला, गुणपत्रक) आॅनलाईन प्रवेश अपलोड करावेत. संपूर्ण फी भरण्याची सक्ती करू नये.विहित वेळेत आॅनलाईन अपलोड न केल्यास तसेच आर्थिक कारणाकरिता विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील, अशा प्रकारच्या सर्व सूचना पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी केल्या आहेत.पहिल्या यादीत नाव आलेल्यांनी प्रवेश घेणे आवश्यक : अन्यथा प्रक्रियेबाहेरपसंतीक्रमांक १ अँलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम स्टुडंट लॉगिन मध्ये जाऊन प्रोसिड बटणावर क्लिक करणे गरजेचे आहे. तरच त्यांचे नाव कॉलेजच्या यादीमध्ये समाविष्ट होईल व त्यानंतर कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रे देऊन प्रवेश आॅनलाईन अपलोड करुन प्रवेश निश्चित करावा व प्रवेश मिळाल्याची प्रिंट घ्यावी. आपल्या पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाल्याने सहा ते सात जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश आॅनलाईन निश्चित करणे बंधनकारक आहे. जे विद्यार्थी पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झालेले असतानादेखील प्रवेश घेणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित तिसऱ्या फेरीपर्यंत त्यांचा इयत्ता अकरावी आॅनलाईन प्रवेश अर्जाचा क्रमांक व दहावी बोर्डाचा बैठक क्रमांक प्रतिबंधित केला जाईल.पसंतीक्रमांक २ ते १० पैकी कोणत्याही क्रमांकाचे कॉलेज मिळालेले आहे, त्यांनी प्रथम स्टुडंट लॉगिन मध्ये जाऊन प्रोसिड या बटणावर क्लिक करणे गरजेचे आहे. तरच, त्यांचे नाव कॉलेजच्या यादीमध्ये समाविष्ट होईल व त्यानंतर कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रे देऊन प्रवेश आॅनलाईन अपलोड करुन प्रवेश निश्चित करावा व प्रवेश मिळाल्याची प्रिंट घ्यावी.पसंती क्रमांक २ ते १० अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना जर तो प्रवेश मान्य नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी दुसºया गुणवत्ता यादीची वाट पाहावी. अलॉट झालेला प्रवेश तात्पुरत्या स्वरूपात घेणे अथवा महाविद्यालयात जाऊन प्रवेश रद्द करणे अशा कोणत्याही कार्यवाहीची आवश्यकता नाही.प्रवेशाच्या वेळीआवश्यक ती कागदपत्रे विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झालेले नाहीत, त्यांना पुढील फेरीत गुणवत्ता व वैधानिक आरक्षणानुसारउपलब्ध जागेवर प्रवेश मिळतील. अशा विद्यार्थ्यांनी पुढील फेरीची वाट पाहावी.पसंतीक्रमांक २ ते १० पैकी कोणत्याही पसंतीक्रमांकाचे महाविद्यालय अलॉट झाले असल्यास व महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतलेला असल्यास व नंतर प्रवेश काही कारणास्तव रद्द केला असल्यास अशाही विद्यार्थ्यांचा अकरावी आॅनलाईन प्रवेश अर्जाचा क्रमांक व दहावी बोर्डाचा बैठक क्रमांक प्रतिबंधित केला जाणार आहे. त्यामुळे प्रवेश घ्यायचा किंवा नाही, हे पालक व विद्यार्थी यांनी विचारपूर्वक ठरवूनच निर्णय घ्यावा. त्यानंतर कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही. याची नोंद घ्यावी.यादीनुसार प्रवेश ...रिक्त जागांचा तपशील आणि कट आॅफ : ६ ते ९ जुलैगुण प्रसिद्ध : १० जुलैभाग १ आणि २ भरण्यासाठी उपलब्ध : १० ते ११ जुलैदुसरी नियमित गुणवत्ता यादी : १३ जुलैयादीनुसार प्रवेश : १४ ते १६ जुलैरिक्त जागा जाहीर : १७ जुलैभाग १ आणि २ भरणे : १८ ते १९ जुलैतिसरी गुणवत्ता यादी : २३ जुलैयादीनुसार प्रवेश घेणे : २४ ते २५ जुलैरिक्त जागा आणि तिसºया यादीतीलकट आॅफ जाहीर : २६ जुलैभाग १ आणि २ भरणे : २६ ते २७ जुलैचौथी गुणवत्ता यादी जाहीर : २९ जुलैयादीनुसार प्रवेश घेणे : ३० ते ३१ जुलै

टॅग्स :Puneपुणे