अकरावीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेस सर्वाधिक पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:23+5:302021-09-02T04:25:23+5:30
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाची पहिली फेरी नुकतीच संपली असून विद्यार्थ्यांनी विज्ञान ...

अकरावीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेस सर्वाधिक पसंती
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाची पहिली फेरी नुकतीच संपली असून विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेस सर्वाधिक पसंती दिली आहे. आतापर्यंत एकूण १२ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे.
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेनंतर वाणिज्य शाखेतील इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. त्यातही १ हजार ३५ विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमात वाणिज्य शाखेत तर १ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत इनहाऊस कोट्यातून प्रवेश घेतला.
अकरावी प्रवेशासाठी पहिल्या फेरीतून पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळूनही ४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. तर एकूण १४ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश मिळूनही प्रवेश निश्चित केला नाही. त्यामुळे १० हजार विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीत पुन्हा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवू शकणार आहेत.
---------------------------------
पहिल्या फेरीतून घेतलेल्या झालेल्या प्रवेशाची आकडेवारी
शाखा इनटेक प्रवेशित विद्यार्थी रिक्त जागा
कला मराठी ७,५५९ १६४८ ५९११
कला इंग्रजी ५७९३ ७६८ ५०२५
वाणिज्य मराठी ११,२८८ २८१३ ८,५७५
वाणिज्य इंग्रजी २३,१७३ ६४३९ १६,७३४
विज्ञान ३५,६५० १२,४२७ २३,१४८