शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशास मुदतवाढ

By admin | Updated: June 23, 2014 00:25 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, या प्रवेश प्रक्रियेस पुणे विभागीय शिक्षण संचालक कार्यालयातर्फे येत्या २४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी कळविले आहे.विद्यार्थ्यांना अकरावी आॅनलाईन प्रवेशाचा पहिला व दुसरा भाग येत्या १९ ते २३ जून या कालावधीत भरण्यास मुदत देण्यात आली होती. परंतु, संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात दाखल झाल्या आहेत. पालख्यांमुळे शहरातील वर्दळ वाढली आहे. काही शाळांमध्ये दिंडी व वारकरी मुक्कामास आहेत. परिणामी विद्यार्थी व पालकांना शाळेत व सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास एक दिवसाची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पालकांकडून केली जात होती.ज्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत, त्यांना प्रवेश अर्ज भरता यावा या उद्देशाने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे आॅनलाईन प्रक्रियेचा पहिला व दुसरा भाग भरण्यास २४ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या (एसएससी बोर्ड) ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा हवा आहे, त्यांनी आपले प्रवेश अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अ‍ॅप्रूव्ह केले नसतील तर अ‍ॅप्रूव्ह करून घ्यावेत. त्यानंतर आॅप्शन फॉर्म भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.एसएससी बोर्डाव्यतिरिक्त इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आपले अकरावीचे प्रवेश अर्ज एमएमसीसी, नेस वाडिया कॉलेज येथून अ‍ॅप्रूव्ह करून घ्यावेत. त्यानंतरच सबमिट व कन्फर्म करावेत, असेही शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आॅनलाईन प्रवेशाच्या एकूण ६९ हजार ८९८ जागांपैकी ५७ हजार ४४३ विद्यार्थ्यांनी अ‍ॅप्लिकेशन फॉर्म (पहिला भाग) अ‍ॅप्रूव्ह केला असून, ५ हजार ८ हजार ७७७ विद्यार्थ्यांनी कन्फर्म केला आहे. तर ४0 हजार १४0 विद्यार्थ्यांनी अ‍ॅप्लिकेशन फॉर्म (दुसरा भाग) भरण्यासाठी लॉग इन केले असून, त्यातील ३४ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी फॉर्म कन्फर्म केला असून, ४ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी अपूर्ण फॉर्म भरला आहे. (प्रतिनिधी)