शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

साडेअकरा टीएमसी पाण्याचा पुणेकरांसाठी केला करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 11:29 IST

मुख्य सभेत मंजुरी : जुन्याच करारानुसार एक महिन्यासाठी नवीन करार  

ठळक मुद्देपालिका आणि जलसंपदामध्ये २०१३ मध्ये पाणीवाटपाचा करारनामा

पुणे : जलसंपदा विभाग आणि महापालिकेमधील पाणीवाटपाचा करार संपुष्टात आल्यानंतर, सहा महिन्यांची दिलेली मुदतवाढही संपलेली आहे. त्यामुळे साडेअकरा टीएमसी पाणीवाटपाच्या जुन्याच करारानुसार एक महिन्यासाठी नवीन करार करण्यास पालिकेच्या गुरुवारी झालेल्या मुख्य सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.पालिका आणि जलसंपदामध्ये २०१३ मध्ये झालेला पाणीवाटपाचा करारनामा २८ फेब्रुवारी २०१९ रोजी संपुष्टात आला. पालिकेने आधीच्या पाणी कोट्यामध्ये वाढ करून, हा कोटा १७.५ टीएमसी करण्याबाबत जलसंपदाला पत्र दिले होते. शहराची लोकसंख्या वाढल्याने पाण्याचा कोटा वाढविणे, पाण्याचे अंदाजपत्रक तयार करणे यासाठी कालावधी लागणार होता. पालिकेकडून १२ एप्रिल रोजी पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून जलसंपदाच्या अधीक्षक अभियंत्यांना सादर करण्यात आले होते. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (एमडब्ल्यूआरआरए)च्या सूचनेनुसार नवीन करारनामा मसुदा व वाढीव पाणीकोटा मंजूर होईपर्यंत शासनाच्या अटी व शर्तींसह ११.५० टीएमसी कोट्याप्रमाणे करारनामा तयार करून पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. भविष्यात जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यादरम्यान पाणीवापराबाबत वाढीव कोट्याप्रमाणे करारनामा करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना प्रदान करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. नव्याने करण्यात येणाºया कराराचा मसुद्याला १३ सप्टेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली होती. हा विषय मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर आला होता.यावेळी, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक सुभाष जगताप, योगेश ससाणे, विशाल तांबे, बाबूराव चांदेरे, प्रिया गदादे यांनी प्रश्न विचारले. भामा-आसखेडचे मिळणारे पाणी १७.५ टीएमसीमध्ये समाविष्ट आहे का, वाढीव दराने पैसे देणार का, पाण्याची १७.५ टीएमसी पाणी कशाच्या आधारे मागितले आहे, पालिकेवर जलसंपदाची नेमकी थकबाकी किती आहे, जलसंपदाने टाकलेल्या अटींसदर्भात नगरसेवकांनी प्रश्न विचारले.त्यावर पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी खुलासा केला. ११.५० टीएमसीपेक्षा अधिकच्या पाणी कोट्यासाठी स्वतंत्रपणे करारनामा करण्याचे ठरले होते. त्यासाठी जलसंपदाने मंत्रिमंडळाची मंजुरी घेणे आवश्यक होते. परंतु, यानंतर आचारसंहिता लागल्याने ही मंजुरी घेतली गेली नाही. सहा वर्षांचा करार संपल्यानंतर, ९० दिवसांत करार करणे आवश्यक असते. परंतु, करार संपल्यानंतर त्याला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. करारनामा न करता पाणी उचलण्यात आल्यास पाटबंधारे विभागाकडून दुप्पट दंडाची आकारणी करण्यात येते. पाण्याचे दर ठरविण्याचा अधिकार जलसंपदाला नसून जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला आहे. सुरुवातीला जलसंपदाने ४५० कोटी रुपयांची थकबाकी काढली होती. पालिकेच्या अधिकाºयांनी त्यांना भेटून आकडे काढल्यावर २५० कोटींचा आकडा आला. त्यानंतर वाद झाल्यावर, १५० कोटींवर हा आकडा आला. त्यातील १२० कोटी रुपये जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत. धरणामधून बंदनलिकेद्वारे पाणी उचलले जात असल्याने दहा हजार लिटरमागे २५ पैसेप्रमाणे पैसे द्यावे लागत असून, पालिकेच्या पैशांची बचत होत आहे. पालिकेच्या हद्दीतील लोकसंख्येनुसार १७.५ टीएमसी पाण्याची मागणी करण्यात आली आहे..............पाण्याबाबत अधिकार जिल्हाधिकाºयांकडे जलसंपदा आपल्या थकीत पैशांबद्दल सतत पत्र पाठवते. वाढीव पाणी वापरले, तर दंड आकारला जातो; परंतु जलसंपदाने धरणाचा मालमत्ता कर भरलेला नाही. त्यांना नोटीस पाठविली आहे का?, त्यांना दोन टक्के दराने व्याज आकारणार का, असा प्रश्न काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केल............. राष्ट्रपती राजवटीमुळे कालवा समितीचे सदस्य सचिव असलेल्या जिल्हाधिकाºयांकडे पाण्यासंदर्भातील अधिकार आले आहेत; परंतु जिल्हाधिकारी यांनी कालवा समितीची बैठक झाल्यावर त्यामधील निर्णयानुसार कार्यवाही होईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर, होणाºया कालवा समितीच्या बैठकीत याविषयी निर्णय होण्यास वेळ लागणार आहे........यावेळी झालेल्या चर्चेनंतर नवीन कालवा समिती अस्तित्वात येईपर्यंत हा करार करण्यास सभेने परवानगी दिली. त्यामुळे पालिकेला तूर्तास ११.५ टीएमसी पाणी घ्यावे लागणार आहे.

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका