विद्युतपुरवठा खंडित; कार्यालयीन कामकाज ठप्प

By Admin | Updated: May 30, 2014 05:03 IST2014-05-30T05:03:05+5:302014-05-30T05:03:05+5:30

येथे गुरुवारी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. शासकीय कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

Electrification breaks; Office work jam | विद्युतपुरवठा खंडित; कार्यालयीन कामकाज ठप्प

विद्युतपुरवठा खंडित; कार्यालयीन कामकाज ठप्प

वडगाव मावळ : येथे गुरुवारी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. शासकीय कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. बाजार असल्यामुळे आणि लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे गुरुवारी वडगावमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सकाळी १० :३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तहसीलदार , भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, पंचायत समिती, बँका व खासगी झेराक्स दुकानातील कामे ठप्प होती. नागरिक कधी विद्युत पुरवठा सुरू होतो याची विचारना करत होते. कार्यालयात विद्युत पुरवठा खंडित असल्याने कर्मचारी रिकामे बसले होते. ऐरवी कार्यालये नागरिकांच्या गर्दीने गजबजलेली असतात. तीच कार्यालये गुरुवारी ओस पडलेली होती. शासकीय अधिकारी व कर्मचारी अपुर्‍या प्रकाशात प्रलंबित कामकाज करत बसले होते. दुय्यम निबंधक कार्यालयात सकाळी नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरू होईल याची प्रतीक्षा करून तळेगाव दाभाडे व लोनावळा दुय्यम निबंधक कार्यालयाकडे धाव घेतली. अगोदरच रांगा लाब असल्याने वडगाव येथून गेलेल्या नागरिकांचे खरेदी विक्री दस्ताचे नोंदणीचे काम झाले नाही. काही कार्यालयातील पर्यायी विद्युत पुरवठ्याची व्यवस्था केवळ ४ ते ५ तास चालली. दिवसभर उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरीक हैराण झाले होते. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या शासकीय कार्यालयात २४ तास विद्युत प्रवाह सुरू करण्याची मागणी सरपंच संतोष जांभूळकर, अंकुश काकरे, चंद्रकांत ओव्हाळ, माजी उपसरपंच विशाल वहिले, अतुल वायकर, प्रतिक पिंजण आदींनी केले आहे. ‘‘उपअभियंता भागवत थेटे म्हणाले, ‘‘मंगळवारी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने वडगाव मावळ परिसरातील अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून विद्युत वाहिनी व खांबावर पडल्याने पुरवठा खंडित झाला होता. सैल तारा सरळ करणे व मोडलेले खांब बसविण्याच्या कामासाठी सकाळी १०:३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.’’(वार्ताहर)

Web Title: Electrification breaks; Office work jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.