शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील विद्युत पुरवठा पूर्ववत : महावितरणची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:38 IST

पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले..

ठळक मुद्दे पुराचे पाणी ओसरल्यानंतर युद्धपातळीवर काम

पुणे : धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या भागांना फटका बसल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील सुमारे साठ हजार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. नदीतील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम हाती घेत, बुधवारी (दि. ७) दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात यश मिळविले. मात्र, कृषी पंपाचा वीज पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. महावितरणच्या तांत्रिक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळपासून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बाणेर व बोपोडीतील ४ व रास्ता पेठ येतील ७ रोहित्रांचा वीजपुरवठा बुधवारी सायंकाळपर्यंत सुरळीत करता आला नाही. ४० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा नागरिकांच्या सुरक्षतेसाठी खंडित करावा लागला. त्यामुळे औंध, बाणेर, बालेवाडी, बावधन, खडकी, बोपोडी, पीएमसी बिल्डिंग परिसर, जुनी सांगवी, मधुबन सोसायटी, पिंपळे गुरव, चिंचवड, संजय गांधीनगर, कासारवाडी, वाकड, कस्पटे वस्ती, पवनानगर, पिंपळे निलख, काळेवाडी, शिवतीर्थ, विश्रांतवाडी, वडगावशेरी, कोंढवा, पिसोळी, मांजरी व मुंढवा परिसर अंधारात गेला. मुळशी तालुक्यातील गावे, पूर्व हवेलीतील भाग, उरुळी कांचन, मांजरी, आष्टापूर, रीहे, पौड, लोणी व थेऊर या भागातील बत्ती गुल्ल झाली होती......मंगळवार संध्याकाळपासून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. रात्रीच्या वेळेस काम करून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत होते. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत बहुतांश भागातील विद्युत पुरवठा सुरळीत केला. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणRainपाऊसDamधरण