वीजग्राहक तक्रार निवारण दिन बुधवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 13:46 IST2017-10-03T13:40:56+5:302017-10-03T13:46:34+5:30

महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन बुधवारी करण्यात आले आहे.

Electricity Grievance Redressal Day Wednesday | वीजग्राहक तक्रार निवारण दिन बुधवारी

वीजग्राहक तक्रार निवारण दिन बुधवारी

ठळक मुद्देवीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबील, नवीन कनेक्शन आदींसह वीजसेवेशी संबंधित तक्रारी त्वरीत निकाली काढण्यासाठी या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.या विभाग कार्यालयांत सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान कार्यकारी अभियंता हे वीजग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेतील

पुणे : पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांत बुधवारी (दि. ४ आॅक्टोबर) महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
वीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबील, नवीन कनेक्शन आदींसह वीजसेवेशी संबंधित तक्रारी त्वरीत निकाली काढण्यासाठी सर्व विभाग कार्यालयांत या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रास्तापेठ, पद्मावती, नगररोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभाग कार्यालयांत सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान कार्यकारी अभियंता हे वीजग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेतील आणि त्या निवारणासाठी तत्काळ कार्यवाही करणार आहेत.

Web Title: Electricity Grievance Redressal Day Wednesday

टॅग्स :Puneपुणे