शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरुमला आग; ७ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:43 IST

अर्धा डझनहून अधिक इलेक्ट्रिक गाड्या जळून खाक

पुणे: देशभरात इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री वाढताना दिसत आहे. परंतु अशामध्येच पुण्यात एका दुचाकी शोरुमला आग लागून ७ इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये कोणतेही जिवितहाणी झालेली नाही. ही घटना पुणे शहरातील गंगाधाम परिसरातील एका शोरुमध्ये घडली. या भागात असणाऱ्या दुचाकी शोरूममध्ये अर्धा डझनहून अधिक इलेक्ट्रिक गाड्या आग लागून द्या जळून खाक झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करावं की करू नये असा संभ्रम सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे.

ही आगीची घटना मार्केट यार्ड भागातील गंगाधाम परिसरात घडली आहे. इथं असणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या कंपनीच्या शोरूममध्ये भीषण आग लागली होती. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली असून यावेळी शोरूममधल्या ७ इलेक्ट्रिक गाड्यांनी पेट घेतला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी आग लागताच लगेच अग्निशमन दलाला पाचारण केलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काहीच वेळात ही आग आटोक्यात आणली. हा प्रकार इलेक्ट्रिक वाहनांचा शोरूमध्ये घडल्यामुळे कंपनी ग्राहकांवर खापर फोडू शकणार नाही.

आग कशी लागली?

शोरूमध्ये लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाहीये. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, या शोरूममध्ये इलेक्ट्रिक गाड्या चार्ज केल्या जात होत्या. त्यावेळी गाड्यांनी पेट घेतला. सध्या या लागलेल्या आगीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरुवातीला आग फक्त एकाच गाडीला लागली होती. त्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या इतर बाइकलाही आग लागली. आग वाढल्याने या घटनेत तब्बल अर्धा डझन इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरfire brigade puneपुणे अग्निशामक दलfireआग