शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका आल्यात ; आता राम मंदिराचा प्रचार सुरु होईल : उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 19:02 IST

राम मंदीर, ३७० कलम, समान नागरी कायदा या घोषणा याआधीही दिल्या होत्या, केले मात्र काहीच नाही : उद्धव ठाकरे

ठळक मुद्देविद्यापीठाचा गोंधळ दुर्लक्षित व्हावा यासाठी भगवदगीतेचा विषय.. मी स्वत:ही जिओ विद्यापीठ शोधतो आहे ..... नाणार प्रकल्पाला कायमच विरोध राहणार

पुणे: निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी नेहमीच घोषणा देत असते. पण त्या फसव्या असतात. ३७० कलम, समान नागरी कायदा या घोषणा याआधीही दिल्या होत्या, केले मात्र काहीच नाही. त्यांनी आता २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर बांधणार असा प्रचार सुरू केला आहे. भाजपा हा फसव्या घोषणा करणारा पक्ष आहे. परंतु, ज्याप्रमाणे नोटाबंदी एका क्षणात केली मग राममंदिर का नाही करत असा खडा सवाल उपस्थित करत   निवडणुकाजवळ आल्या आहेत, आता ते राम मंदिराचा प्रचार प्रकर्षाने सुरु करतील, अशा खरमरीत शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला. 

पक्षाच्या कार्यक्रमासाठी म्हणून पुण्यात आलेल्या ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यातही त्यांनी भाजपा सोडले नाही. तब्बल दोन वर्षांनी पुण्यात आलो आहे असे म्हणत त्यांनी पुण्याकडे थोडे दुर्लक्षच झाले अशी खंतही व्यक्त केली.केंद्र तसेच राज्यातील भाजपाच्या सरकारच्या कारभारावरून ते स्वप्न दाखवत आहेत असेच वाटते आहे. स्वप्न पुर्ण झाली नाही की जनता काय करते हेही त्यांना समजेल. पक्ष वाढवणे हे माझे कर्तव्यच आहे. त्यासाठी त्यांना काय वाटेल याची काळजी मी करत नाही, करणार नाही. जनतेच्या अपेक्षा पुर्ण करणाऱ्यांच्या मागे जनता उभी राहते यावर माझा विश्वास आहे असे ठाकरे म्हणाले. पुण्यात थोडी बेदिली होती, मात्र आता भक्कम एकी झाली आहे. तसे सर्वांनी मला सांगितले आहे. त्यामुळे आता पुण्याकडे बारकाईने लक्ष देणार आहे असे ते म्हणाले.नाणार प्रकल्पाला विरोध का यावर बोलताना ठाकरे म्हणाले, या प्रकल्पामुळे कोकण कोकण राहणार नाही एवढेच सांगतो. आमचा विरोध त्यासाठी आहे. नाणारमुळे समृद्धी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र निसर्गाचा विध्वंस करून येणारी समृद्धी आम्हाला नको आहे. आमचा या प्रकल्पाला कायमच विरोध राहणार आहे. तो मागे घेण्याचा प्रश्नच नाही.विद्यापीठाचा गोंधळ दुर्लक्षित व्हावा यासाठी भगवदगीतेचा विषय काढला असावा. मी स्वत:ही त्यांनी सांगितलेले जिओ विद्यापीठ शोधतो आहे असे ठाकरे म्हणाले. सरकारमध्ये राहून सरकारशीच कसे काय भांडता असे विचारले असता आम्ही स्वार्थासाठी भांडत नाही तर जनहितासाठी भांडत आहोत असे सांगितले. सरकारमध्ये आहे म्हणजे त्यांनी कसेही करावे व आम्ही ते मान्य करावे असे होत नाही. जे हिताचे आहे तेच मान्य करणार असे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा