स्थायी, शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक पाच मार्चला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST2021-03-01T04:12:15+5:302021-03-01T04:12:15+5:30

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची, तसेच शिक्षण समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक येत्या पाच मार्च रोजी घेण्यात येणार ...

Election of Standing, Education Committee Chairman on 5th March | स्थायी, शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक पाच मार्चला

स्थायी, शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक पाच मार्चला

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची, तसेच शिक्षण समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक येत्या पाच मार्च रोजी घेण्यात येणार आहे़ सांगली महापालिकेतील भाजपमधील मतफुटीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने विशेष खबरदारी घेऊन, भाजपच्या सर्व नगरसेवकांना या निवडणुकीच्या वेळी ऑनलाईन सभेला उपस्थिती अनिवार्य केली आहे. याबाबतचा ‘व्हिप’ बजावला असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे़

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या दोन्ही निवडणुकीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश नुकतेच काढले आहेत. त्यानुसार ५ मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकांकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत़

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनी पुनर्नियुक्ती होणार असल्याचे बोलले जात असून, शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मंजूश्री खर्डेकर, तर उपाध्यक्षपदी कालिंदा पुंडे यांची निवड होणार असल्याचे भाजपच्या गोटात सांगितले जात आहे़ महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने या दोन्ही समित्यांवर भाजपच्या उमेदवारांशी सरशी होईल हे निश्चित आहे़ परंतु, ऑनलाईन सभेची गैरहजरी व नुकत्याच सांगली नगरपालिकेतील भाजप मतफुटीची घटना पाहता, भाजपने या निवडणुकांसाठी उपस्थितीबाबत व्हिप जारी केला आहे़

-------------------------------------

Web Title: Election of Standing, Education Committee Chairman on 5th March